IPL 2023 Points Table | सलग विजयानंतरही दिल्ली कॅपिटल्स तळाशी कायम, पॉइंट टेबल पाहिलात का
दिल्लीने मागील आणि आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवला असला तरी पॉइंट टेबलमध्ये ते तळाशी कायम आहेत. त्यांच्याचवर हैदराबाद संघ आहे. आता दोन्ही संघांचे 4 गुण झाले आहेत.
मुंबई : दिल्ली कॅपिटल्स संघाने सनरायझर्स हैदराबादवर मात करत स्पर्धेतील आपला सलग दुसरा विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघाला या पराभवाचा मोठा फटका बसला आहे. दिल्लीने केकेआर आणि आजच्या हैदाराबादविरूद्धचा सामना जिंकला असला तरी तरी पॉइंट टेबलमध्ये ते तळाशी कायम आहेत. त्यांच्याचवरच हैदराबाद संघ असून दोन्ही संघांचे 4 गुण झाले आहेत.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
दिल्ली कॅपिटल्स संघाने सुरूवातीचे पाच सामने गमावले होते. त्यामुळे आता दोन विजय मिळवूनही ते पॉइंट टेबलच्या तळाशी असलेले पाहायला मिळत आहेत. हैदराबाद संघानेही सात सामन्यांमध्ये दोन विजय मिळवले असून दोन्ही संघांमध्ये हैदराबाद नऊव्या स्थानावर आणि दिल्ली दहाव्या स्थानावर आहे.
सीएसके दहा गुणांसह पहिल्या स्थानी तर त्या पाठोपाठ राजस्थान, लखनऊ, गुजरात, आरसीबी आणि पंजाब हे संघ असून त्यांचे 8 गुण आहेत. सातव्या स्थानी मुंबई इंडियन्स 6 गुणांसह आहे. आठव्या, नऊव्या आणि दहाव्या स्थानी अनुक्रमे केकेआर, हैदराबाद आणि दिल्ली हे संघ आहेत.
सामन्याचा धावता आढावा
दिल्लीला हैदराबाद संघाने 144 धावांच्या आतमध्ये रोखलं होतं. हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या. तर भुवनेश्वर कुमार यानेही अप्रतिम गोलंदाजी केलेली. दिल्लीकडून अक्षर पटेल आणि मनीश पांडे यांनी सर्वाधिक 34 धावा केल्या. दिल्लीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाची सुरूवात एकदम खराब झाली होती. मयंक अग्रवालने सर्वाधिक 41 धावा त्यानंतर क्लासेनने 31 धावा आणि सुंदड याने नाबाद 24 धावा केल्या. मात्र कोणीही हैदराबादला विजय मिळवून देऊ शकलं नाही.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, एडन मार्कराम (C), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (W), मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (C), फिलिप सॉल्ट (W), मिचेल मार्श, मनीष पांडे, सरफराज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, इशांत शर्मा