IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 चा सीजन हळूहळू रंगत चाललाय. प्रत्येक सामन्यानिशी रोमांच वाढतोय. वीकेंडला डबल हेडर सामन्यांच्यावेळी उत्सुक्ता आणि उत्साह टिपेला पोहोचतो. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये मॅच असेल, तर चाहत्यांसाठी ती एक मेजवानी असते. शनिवारी 8 एप्रिलला मुंबई आणि चेन्नईमध्ये डबल हेडरचा दुसरा सामना झाला. या मॅचमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या टीमने आरामात विजय मिळवला. मात्र, तरीही ते राजस्थान रॉयल्सला मागे टाकू शकले नाहीत. सध्या राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर आहे.
शनिवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सध्ये पहिला सामना झाला. राजस्थानने या मॅचमध्ये 57 धावांनी विजय मिळवला. दिल्लीचा हा सलग तिसरा पराभव आहे.
चेन्नईचा कितवा विजय?
राजस्थान टीम तीन सामन्यात दोन विजयासह पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. दुसऱ्या मॅचमध्ये चेन्नईने मुंबई इंडियन्सला 7 विकेटने हरवलं. चेन्नईचा 3 मॅचमधील हा दुसरा विजय आहे. पण ते राजस्थानला पहिल्या स्थानावरुन हटवू शकले नाहीत.
पहिल्या स्थानावर कोण?
आयपीएल 2023 मधील 12 व्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलवर एक नजर मारुया. पाच टीम्सचे एकसमान चार-चार पॉइंट्स आहेत. फक्त नेट रनरेटच्या फरकामुळे राजस्थान रॉयल्सची टीम पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सला हटवलं. चेन्नईने आपल्या दुसऱ्याविजयासह पंजाब किंग्सला मागे टाकलं. ते चौथ्या स्थानावर आहेत. गुजरात टायटन्स तिसऱ्या स्थानावर आहेत.
टीम | सामना | विजय | पराजय | नेट रनरेट | पॉइंट्स |
---|---|---|---|---|---|
राजस्थान रॉयल्स | 3 | 2 | 1 | +2.067 | 4 |
लखनौ सुपर जायंट्स | 3 | 2 | 1 | +1.358 | 4 |
गुजरात टायटन्स | 2 | 2 | 0 | +0.700 | 4 |
चेन्नई सुपर किंग्स | 3 | 2 | 1 | +0.356 | 4 |
पंजाब किंग्स | 2 | 2 | 0 | +0.333 | 4 |
कोलकता नाइट रायडर्स | 2 | 1 | 1 | +2.056 | 2 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 2 | 1 | 1 | -1.256 | 2 |
मुंबई इंडियन्स | 2 | 0 | 2 | -1.394 | 0 |
दिल्ली कॅपिटल्स | 3 | 0 | 3 | -2.092 | 0 |
सनरायजर्स हैदराबाद | 2 | 0 | 2 | -2.867 | 0 |
कालचे सामने हरणारी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सची टीम पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या तीन स्थानांवर आहेत. दिल्ली सलग तीन पराभवांसह नवव्या आणि मुंबई सलग दोन पराभवांसह आठव्या स्थानावर आहे. शेवटच्या स्थानावर अजूनही सनरायजर्स हैदराबादची टीम आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सहाव्या स्थानावर आहे.
आजच्या मॅचमुळे पॉइंट्स टेबलमध्ये काय चित्र बदलेल?
आता रविवारी डबल हेडरचे सामने होतील. त्यामुळे पुन्हा एकदा पॉइंट्स टेबलमधील चित्र बदलू शकतं. गतविजेते गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सची टीम आमने-सामने येणार आहे. गुजरात टायटन्सने सलग दोन सामने जिंकलेत. सलग तिसरा विजय मिळवल्यास ते नंबर 1 होतील. दुसऱ्या मॅचमध्ये पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना होईल. पंजाबची टीम विजयाची हॅट्ट्रिक करुन पहिल्या स्थानावर पोहोचू शकते.