IPL 2024 Points Table: चेन्नईने कोलकात्याला पराभूत करून गुणतालिकेत तसा काही फरक नाही

आयपीएल 2024 स्पर्धेतील प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसते. मात्र चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यानंतर गुणतालिकेवर काहीच फरक पडला नाही. कोलकाता आणि चेन्नईच्या नेट रनरेटवर काय तो फरक पडला. तर क्रमवारी आहे तशी आहे.

IPL 2024 Points Table:  चेन्नईने कोलकात्याला पराभूत करून गुणतालिकेत तसा काही फरक नाही
| Updated on: Apr 08, 2024 | 11:33 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 22 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानात हा सामना झाला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची विजयाची गाडी ट्रॅकवरून उतरली. विजयी चौकार मारण्याचं स्वप्न चेन्नई सुपर किंग्सने भंग केलं. त्यामुळे गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने हा सामना जिंकला असता तर अव्वल स्थान मिळवलं असतं. कारण राजस्थान रॉयल्सच्या तुलनेत कोलकाता नाईट रायडर्सचा नेट रनरेट चांगला आहे. पण चेन्नईने तसं काही होऊ दिलं नाही. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तर फलंदाजीसाठी आलेल्या कोलकात्याला 20 षटकात 9 धक्के देत 137 धावांवर रोखलं. तसेच विजयासाठी मिळालेलं 138 धावांचं आव्हान 17.4 षटकात पूर्ण केलं. चेन्नईकडून तुषार देशपांडे आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

राजस्थान रॉयल्सने चार पैकी चार सामने जिंकत 8 गुण आणि 1.120 नेट रनरेटसह पहिलं स्थान गाठलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 4 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह दुसरं स्थान गाठलं आहे. कोलकात्याचा नेट रनरेट 1.528 इतका आहे. लखनौ सुपर जायंट्स 6 गुण आणि 0.775 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्स 6 गुण आणि 0.666 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे.

सनरायझर्स हैदराबाद 4 गुण आणि 0.409 नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर, पंजाब किंग्स 4 गुण आणि -0.220 नेट रनरेटसह सहाव्या, गुजरात टायटन्स 4 गुण आणि -0.797 नेट रनरेटसह सातव्या, मुंबई इंडियन्स 2 गुण आणि -0.704 नेट रनरेटसह आठव्या, रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु 2 गुण आणि -0.843 नेट रनरेटसह नवव्या आणि दिल्ली कॅपिटल्स 2 गुण आणि -1.370 नेट रनरेटसह दहाव्या स्थानावर आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश थीक्षाना