IPL 2024 Points Table: लखनौ सुपर जायंट्सचा चेन्नईला दणका, गुणतालिकेत वाढली रंगत
IPL 2024 Points Table: आयपीएल 2024 स्पर्धेतील 34 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 176 धावा केल्या आणि विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान लखनौने 8 गडी राखून जिंकलं.
आयपीएल 2024 स्पर्धेतील प्लेऑफची रंगत आता आणखी वाढत चालली आहे. प्रत्येक सामन्यात जय पराजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. सध्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सची बाजू एकदम भक्कम दिसत आहे. पण इतर संघ प्लेऑफसाठी तितकीच ताकद लावत आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्सलाही पुढचे सात सामने जरा जपूनच राहावं लागेल. मागच्या पर्वातही राजस्थान रॉयल्सने सुरुवातीला चांगली कामगिरी केली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात उलथापालथ झाली आणि प्लेऑफमधून पत्ता कट झाला होता. त्यामुळे येत्या काही दिवसात प्लेऑफची रंगत आणखी वाढत जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स या सामन्यानंतरही गुणतालिकेत तसा काही फरक पडला नाही. राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांचे समान 8 गुण आहेत. तर तचर दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचे प्रत्येकी 6 गुण आहेत. तर पंजाब किंग्सचे 4 आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे 2 गुण आहेत.
प्लेऑफची लढत आणखी चुरशीची होण्यामागचं कारण म्हणजे सर्वच संघ एकमेकांजवळ आहेत. त्यामुळे नुसतं जिंकून चालणार नाही तर नेट रनरेटवरही तितकंच लक्ष द्यावं लागेल. राजस्थान रॉयल्सने 7 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह 0.677 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स 8 गुण आणि 1.399 नेट रनरेटसह दुसऱ्या, चेन्नई सुपर किंग्स 8 गुण आणि 0.529 नेट रनरेटसह तिसऱ्या, सनरायझर्स हैदराबाद 8 गुण आणि 0.502 नेट रनरेटसह चौथ्या, लखनौ सुपर जायंट्स 8 गुण आणि 0.123 नेट रनरेटसह पाचव्या स्थानी, दिल्ली कॅपिटल्स 6 गुण आणि -0.074 नेट रनरेटस सहाव्या, मुंबई इंडियन्स 6 गुण आणि -0.133 नेट रनरेटसह सातव्या, गुजरात टायटन्स 6 आणि -1.303 नेट रनरेटसह आठव्या, पंजाब किंग्स 4 गुण आणि -0.251 नेट रनरेटसह नवव्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 2 गुण आणि -1.185 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.
चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 176 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 177 धावांचं आव्हान होतं. हे आव्हान लखनौ सुपर जायंट्ने 19 व्या षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. हा सामना लखनौ सुपर जायंट्सने 8 विकेट्सने जिंकला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर