IPL 2024 Points Table : चेन्नईचा हैदराबादवर 78 धावांनी विजय, पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप
IPL 2024 Points table 46th Match : चेन्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैदराबादवर 78 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने या विजयासह हैदराबादचा मागील पराभवाचा वचपा घेतला आणि पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली.
आयपीएलच्या 17 व्या मोसमात रविवारी 28 एप्रिल रोजी डबल हेडरचा थरार पार पडला. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने होते. आरसीबीने गुजरातला त्यांच्या घरच्या मैदानात 9 विकेट्सने पराभूत केलं. आरसीबीने विजयासाठी मिळालेलं 201 धावांचं आव्हान हे 16 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. आरसीबीचा हा सलग दुसरा आणि एकूण तिसरा विजय ठरला. तर दुसऱ्या सामन्यात चेन्नईने हैदराबादवर विजय मिळवत मागील पराभवाचा वचपा घेतला. चेन्नईने 78 धावांच्या मोठ्या फरकाने हैदराबादवर मात केली. याआधी हैदराबादने चेन्नईला 5 एप्रिलला पराभूत केलं होतं.
चेन्नईने हैदराबादला विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हैदराबादला 134 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईचा हा या हंगामातील पाचवा विजय ठरला. चेन्नईला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये तगडा फायदा झालाय. तर हैदराबादला मोठा फटका बसलाय. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणती टीम कुठे आहे? कुणाला किती फायदा आणि किती तोटा झालाय? हे जाणून घेऊयात.
चेन्नईच्या विजयामुळे हैदराबादसह एकूण 3 संघांना मोठा फटका बसला आहे. हैदराबाद, लखनऊ आणि दिल्ली कॅपिट्ल्स या तिन्ही संघाना एक स्थानाचं नुकसान झालं आहे. तर चेन्नईने या विजयामुळे 3 स्थानाचा फायदा झाला आहे. चेन्नईने थेट सहाव्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. चेन्नईचा नेट रनरेट हा विजयानंतर 0.810 असा झाला आहे, जो सामन्याआधी 0.415 होता. तर दुसऱ्या बाजूला चेन्नई तिसऱ्या स्थानी आल्याने हैदराबाद चौथ्या, लखनऊ पाचव्या आणि दिल्लीची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. हैदराबाद, लखनऊ आणि दिल्लीची नेट रनरेट हा अनुक्रमे 0.075, 0.059 आणि 0.276 असा आहे.
चेन्नईची तिसऱ्या स्थानी झेप
– Kolkata has 10 points. – Chennai has 10 points. – Hyderabad has 10 points. – Lucknow has 10 points. – Delhi has 10 points.
IPL is going to peak in May. 🔥 pic.twitter.com/mQgRjexBYk
— Johns. (@CricCrazyJohns) April 28, 2024
चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान आणि मथीशा पथीराना
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.