IPL 2024 Points Table : गुजरातचा 35 धावांनी विजय, चेन्नईसाठी आता ‘करो या मरो’, पाहा पॉइंट्स टेबलची स्थिती

IPL 2024 Points Table After 59th Match : गुजरातने चेन्नई विरुद्धच्या विजयानंतर फक्त स्वत:चंच आव्हान कायम न ठेवता इतर संघानांही दिलासा दिला आहे. पाहा पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

IPL 2024 Points Table : गुजरातचा 35 धावांनी विजय, चेन्नईसाठी आता 'करो या मरो', पाहा पॉइंट्स टेबलची स्थिती
rashid khan and m s dhoni gt vs cskImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 11, 2024 | 12:22 AM

गुजरात टायटन्सने गेल्या पराभवाचा वचपा घेतला आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 59 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. गुजरातचा कॅप्टन शुबमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर गुजरातने चेन्नईसमोर 232 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 196 धावाच करता आल्या. गुजरातने या विजयासह चेन्नईकडून 26 मार्च रोजी झालेल्या पराभवाचा वचपा घेतला.

गुजरातने या विजयासह प्लेऑफमधील आपलं आव्हान कायम राखलं आहे. चेन्नईच्या पराभवामुळे दिल्ली कॅपिट्ल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुलाही दिलासा मिळाला आहे. गुजरातचा हा या हंगामातील पाचवा विजय ठरला. गुजरातला या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये 2 स्थानांचा फायदा झाला. गुजरातने थेट 10 व्या स्थानावरुन 8 व्या स्थानी झेप घेतली. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईला पराभवामुळे पॉइंट्स टेबलमध्ये तसा काही फरक पडलेला नाही. चेन्नईने चौथं स्थान कायम राखलंय. मात्र चेन्नईचं आता टेन्शन दुप्पटीने वाढलंय.

चेन्नईला आता प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल, तर कोणत्याही परिस्थितीत उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यातही चांगल्या आणि मोठ्या फरकाने विजय आवश्यक असणार आहे. त्यामुळे चेन्नईसाठी पुढील दोन्ही सामन्यांमध्ये ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. चेन्नईने 12 पैकी 6 सामने जिंकलेत. चेन्नईचा नेट रनरेट हा 0.49 असा आहे. तर चेन्नईचे पुढील 2 उर्वरित सामने हे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध असणार आहेत. त्यामुळे चेन्नईला चांगलीच कंबर कसावी लागणार आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा आणि कार्तिक त्यागी.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे आणि सिमरजीत सिंग.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.