IPL 2024 Points Table: सनरायझर्स हैदराबादची टॉप 4 मध्ये एन्ट्री, आरसीबीचं मोठं नुकसान

आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेवर प्रभाव दिसून येत आहे. पण सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत एकाच दगडात तीन पक्षी मारले आहेत. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्सला फटका बसला आहे. तर आरसीबीचं प्लेऑफचं गणित पूर्णत: फिस्कटलं आहे.

IPL 2024 Points Table: सनरायझर्स हैदराबादची टॉप 4 मध्ये एन्ट्री, आरसीबीचं मोठं नुकसान
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 11:18 PM

आयपीएल स्पर्धेतील 30वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचं नाणं खणखणीत वाजलं. नाणेफेकीची कौल गमवल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या वाटेला फलंदाजी आली. पण या संधीचं सोनं करण्यास हैदराबादचे खेळाडू कुठेच कमी पडले नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. नेमका कुठे चेंडू टाकावा हेच गोलंदाजांना कळत नव्हतं. ट्रेव्हिस हेडने 39 चेंडूत शतक ठोकलं. तर त्यानंतर आलेल्या क्लासेनने आपले हात धुवून घेतले. 31 चेंडूत 7 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. आक्रमक खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 3 गडी गमवून 287 धावा केल्या आणि विजयासाठी 288 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठणं बंगळुरुच्या खेळाडूंना पहिल्या चेंडूपासून अशक्यप्राय होतं. तरीही बंगळुरुच्या फलंदाजांनी 262 धावा केल्या. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादला अवघ्या 25 धावांनी विजय मिळाला. दोन गुणांसोबत काही अंशी नेट रनरेटवर सकारात्मक प्रभाव पडला आहे. 8 गुणांसह सनरायझर्स हैदराबाद संघ टॉप 4 मध्ये आला आहे.

राजस्थान रॉयल्स संघ 6 सामन्यापैकी 5 सामन्यात विजय मिळवून 10 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ 8 गुण आणि 1.688 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी, चेन्नई सुपर किंग्स 8 गुण आणि 0.726 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबद 8 गुण आणि 0.502 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्सचा संघ 6 पैकी 3 सामन्यात विजय मिळवून 6 गुण आणि 0.038 नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर आहे.

गुजरात टायटन्स संघ 6 पैकी 3 सामने जिंकत 6 गुण आणि -0.637 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्सचा संघ 6 पैकी 2 सामने जिंकत दोन गुण आणि -0.218 नेट रनरेटसह सातव्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्स 6 पैकी 2 सामने जिंकत 4 गुण आणि -0.234 नेट रनरेटसह आठव्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 4 गुण आणि -0.975 नवव्या स्थानी आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, विजयकुमार विशक, रीस टोपले, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.