IPL 2024 Points Table : राजस्थानच्या पराभवाचा पंजाबला फटका, गुजरातचं काय?

IPL 2024 Points Table After RR vs GT 24th Match : गुजरात टायटन्स टीमला अखेर राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या 17 व्या मोसमात रोखण्यात यश आलं आहे. सलग 4 सामने जिंकणाऱ्या राजस्थानला गुजरातकडून शेवटच्या बॉलवर पराभूत व्हावं लागलं.

IPL 2024 Points Table : राजस्थानच्या पराभवाचा पंजाबला फटका, गुजरातचं काय?
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 12:42 AM

गुजरात टायटन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 24 व्या सामन्यात सलग 4 सामने जिंकलेल्या अजिंक्य राजस्थान रॉयल्स संघांचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला. गुजरातचा फलंदाज राशिद खान याने विजयासाठी 1 बॉलमध्ये 2 धावांची गरज असताना चौकार ठाकून 3 विकेट्सने विजय मिळवून दिला. राजस्थानने विजयासाठी दिलेलं आव्हान गुजरातने 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं. गुजरातचा हा या मोसमातील तिसरा विजय ठरला. तर राजस्थान रॉयल्सचा हा या मोसमातील पहिला पराभव ठरला. या सामन्याच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे आहे? हे जाणून घेऊयात.

राजस्थान रॉयल्सने पराभवानंतरही पॉइंट्स टेबलमधील आपली बादशाहत कायम राखली आहे. राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. मात्र राजस्थानच्या पराभवाचा फटका हा पंजाब किंग्सला बसला आहे. तर गुजरातला एका स्थानाचा फायदा झाला आहे. पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पॉइंट्स टेबलमध्ये वरखाली झालं आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये कोणती टीम कुठे?

पंजाब आणि गुजरात दोन्ही संघ पॉइंट्स टेबलमध्ये सामन्याआधी सहाव्या आणि सातव्या स्थानी होते. मात्र गुजरातने विजयासह सहाव्या क्रमांकावर उडी घेतली. तर त्यामुळे पंजाबची सातव्या स्थानी घसरण झाली आहे. गुजरातचा पराभवाआधी नेट रनरेट हा -0.797 असा होता तो विजयानंतर 0.637 इतका झाला आहे. तर राजस्थानचा नेट रनरेट 0.871 असा झाला आहे तो सामन्याआधी 1.120 असा आहे.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीर), राहुल तेवतिया, राशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद आणि मोहित शर्मा.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.