IPL 2024, Point Table : राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफमधील स्थान पक्कं! तर इतर तीन संघांसाठी चुरस वाढली

आयपीएल 2024 स्पर्धेत रविवारी झालेल्या डबल हेडर सामन्यानंतर मोठी उलथापालथ झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने मुंबईला इंडियन्सला, तर राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं. राजस्थान रॉयल्सचे 16 गुण झाले असून प्लेऑफमधलं स्थान जवळपास पक्कं झालं आहे.

IPL 2024, Point Table : राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफमधील स्थान पक्कं! तर इतर तीन संघांसाठी चुरस वाढली
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 11:14 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना पार पडला. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला 10 धावांनी पराभूत केलं. यानंतर गुणतालिकेत सर्वात मोठी उलटफेर दिसून आलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने थेट पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्स यामुळे दणका बसला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर होता. मुंबईला पराभूत करताच दिल्ली कॅपिटल्सने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत दहा सामने खेळले असून पाच सामन्यात विजय आणि पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. यामुळे एकूण 10 गुणांसह पाचवं स्थान गाठलं आहे. तर चेन्नई सुपर किंग्सचे 8 गुण असून सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सला नवव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. आता मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित पाच सामन्यात विजय मिळवावाच लागेल. अन्यथा मुंबईचं आव्हान संपुष्टात येईल.

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलमधील 44वा सामना रंगला. राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकत गोलंदाजी स्वीकारली.लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 5 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं. राजस्थानने हे आव्हान 19 षटकात पूर्ण केलं. राजस्थान रॉयल्स संघाने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्कं केलं आहे. कारण गुणतालिकेत चौथ्या स्थानासाठी 16 गुणांची आवश्यकता असते. आता आणखी एक सामना जिंकला की जर तरच्या गणितातूनही बाहेर पडेल.

राजस्थान रॉयल्स संघ 16 गुणांसह पहिल्या स्थानी, कोलकाता नाईट रायडर्स 10 गुण आणि 0.972 नेट रनरेटसह दुसऱ्या, सनरायझर्से हैदराबाद 10 गुण आणि 0.577 नेट रनरेटसह तिसऱ्या, लखनौ सुपर जायंट्स 10 गुण आणि +0.059 नेट रनरेटसह चौथ्या, दिल्ली कॅपिटल्स 10 गुण आणि -0.276 नेट रनरेटसह पाचव्या, चेन्नई सुपर किंग्स 8 गुण आणि 0.415 नेट रनरेटसह सहाव्या, गुजरात टायटन्स 8 गुण आणि -0.974 नेट रनरेटसह सातव्या, पंजाब किंग्स 6 गुण आणि -0.187 नेट रनरेटसह आठव्या, मुंबई इंडियन्स 6 गुण आणि -0.261 नेट रनरेटसह नवव्या, आरसीबी 4 गुण आणि -0.721 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.