IPL 2024 Points Table: पंजाब किंग्स राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर गुणतालिकेत असा पडला फरक, जाणून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना राजस्थान रॉयल्स संघाने शेवटच्या षटकात जिंकला. पंजाब किंग्सने विजयासाठी दिलेलं 148 धावांचं आव्हान गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह राजस्थाननं गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवलं आहे.
आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत असते. मात्र पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर त्यात काही फारसा फरक पडला नाही. फक्त काय तर दोन्ही संघांच्या नेट रनरेटवर फरक दिसून आला आहे. आयपीएल स्पर्धेतील 27 व्या सामना खेळण्यासाठी पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला. गोलंदाजी घेत पंजाब किंग्सला 147 धावांवर रोखलं. तसेच विजयासाठी दिलेलं 148 धावांचं आव्हान शेवटच्या षटकात गाठलं आहे. विजयासाठी राजस्थान रॉयल्स चांगलीच धडपड करावी लागली. पण विजय मिळवत राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेतील आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं आहे. 2 गुणांसह आपल्या नेट रनरेट सकारात्मक वाढ केली आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्स संघ आठव्या स्थानावर आहे मात्र नेट रनरेट खूपच खराब झाला आहे. राजस्थान रॉयल्सचे 10 गुणांसह नेट रनरेट 0.767 इतका आहे. तर पंजाब किंग्सचा संघ आठव्या स्थानावर कायम आहे. पण नेट रनरेट -0.218 इतका आहे.
कोलकाता नाईट रायडर्स 6 गुण आणि 1.528 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे.चेन्नई सुपर किंग्स तिसऱ्या स्थानावर, तर लखनौ सुपर जायंट्सची चौथ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्सचा 0.666 रनरेट इतका असून लखनौ सुपर जायंट्सचा 0.436 नेट रनरेट इतका आहे. पाचव्या स्थानावर सनरायझर्स हैदराबाद आहे. हैदराबादचे 6 गुण आणि 0.344 नेट रनरेट आहे. गुजरात टायटन्सचे 6 गुण आणि -0.637 नेट रनरेट असून सहाव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स सातव्या स्थानावर असून 4 गुण आणि -0.073 नेट रनरेट आहे.
दरम्यान पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. हा सामना राजस्थान रॉयल्सने 3 गडी राखून जिंकला. शिम्रॉन हेटमायरने शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार मारून राजस्थानला विजय मिळवून दिला. दुसरीकडे, आयपीएलमध्ये 28 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स, 29 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ होणार आहे.मुंबई इंडियन्सला चौथ्या स्थानावर येण्याची संधी आहे.