IPL 2024 Purple Cap: जसप्रीत बुमराहचा पर्पल कॅपवर दबदबा कायम, टॉप 5 मध्ये कोण?
IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : मुंबई इंडियन्सचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडेच पर्पल कॅप आहे. पाहा पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप 5 गोलंदाजांमध्ये कोण कोण आहेत?
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 19 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्याचं आयोजन हे दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने लखनऊला विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र लखनऊ सुपर जायंट्सला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 189 धावाच करता आल्या. दिल्लीचा हा या मोसमातील सातवा विजय ठरला. दिल्लीने यासह या 17 व्या हंगामातील आपला शेवट विजयाने केला आहे. या सामन्यानंतरही पर्पल कॅप मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराह याच्या नावावर आहे. जसप्रीत बुमराहसह पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये कोण कोण आहे? हे जाणून घेऊयात.
जसप्रीत बुमराहने 13 सामन्यांमध्ये 6.48 इकॉनॉमी रेटसह 336 धावा देत 20 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहची 21 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे. बुमराहनंतर दुसऱ्या स्थानी पंजाब किंग्सचा हर्षल पटेल विराजमान आहे. हर्षलने 12 सामन्यांमध्ये 9.75 इकॉनॉमीने 20 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराह आणि हर्षल दोघांच्या नावे प्रत्येकी 20 विकेट्स आहेत. मात्र हर्षलच्या तुलनेत बुमराहचा इकॉनॉमी रेट हा चांगला असल्याने बुमराहकडे पर्पल कॅप आहे.
तिसऱ्या स्थानी केकेआरचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्थी आहे. वरुणने 12 सामन्यांमध्ये 18 विकेट्स घेतल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा युवा गोलंदाज तुषार देशपांडे आहे. तुषारने 12 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर दिल्ली कॅपिट्ल्सचा खलील अहमद आहे. खलीलच्या नावावर 14 सामन्यांमध्ये एकूण 16 विकेट्स आहेत. खलीलच्या तुलनेत तुषारचा इकॉनॉमी रेट चांगला असल्याने समसमान विकेट्स असूनही तुषार चौथ्या आणि खलील पाचव्या स्थानी आहेत.
दिल्लीचा लखनऊवर 18 धावांनी विजय
Match 64. Delhi Capitals Won by 19 Run(s) https://t.co/qMrFfL9OJ3 #TATAIPL #IPL2024 #DCvLSG
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2024
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर मॅकगुर्क, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि खलील अहमद.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेईंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक आणि मोहसिन खान.