IPL 2024 Purple Cap: पर्पल कॅपच्या रेसमध्ये कोण आघाडीवर, या खेळाडूंमध्ये जोरदार चुरस
IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : पर्पल कॅपचा साज अजूनही जसप्रीत बुमराहच्या डोक्यावर कायम आहे. जसप्रीत बुमराहला विकेट मिळाली नाही. पण त्याच्या जवळपास अजून कोणी पोहोचलं नाही.
आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला सातव्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत फक्त 3 सामने जिंकले असून प्लेऑफचं गणित फिक्सटलं आहे. आता प्लेऑफच्या आशा जवळपास धुसर झाल्या आहेत. त्यामुळे पुढचे उरलेले सामने आता फक्त औपचारिकता असणार आहे. मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान लखनौ सुपर जायंट्सने 19.2 षटकात 4 गडी राखून पूर्ण केलं. या विजयासह लखनौने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहची जादू काही दिसली नाही. 4 षटकं टाकली आणि 17 धावा दिल्या मात्र विकेट काही घेता आली नाही. असं असलं तरी जसप्रीत बुमराह या यादीत पहिल्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराहने 24 चेंडूत फक्त 17 धावा दिल्याने इकोनॉमी रेट सुधारला आहे. या सामन्यापूर्वी 14 विकेटसह इकोनॉमी रेट हा 6.63 इतका होता. आता हा इकोनॉमी रेट 6.40 इतका झाला आहे. त्याने एकूण 40 षटकं टाकली असून 256 धावा दिल्या आहेत.
पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा मुस्तफिझुर रहमान आहे. त्याने 8 सामन्यात 14 गडी बाद केले. त्याने 30.2 षटकं टाकली आणि 296 धावा दिल्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 9.75 इतका आहे. तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सचा हर्षल पटेल आहे. त्यानेही 32 षटकं टाकत 326 धावा देत 14 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट हा 10.18 इतका आहे. चौथ्या क्रमांकावर चेन्नईचा मथीशा पथिराना आहे. त्याने 13 गडी बाद केले आहेत. तर पाचव्या स्थानावर सनरायझर्स हैदराबादचा टी नटराजन असून त्यानेही 13 गडी बाद केले आहेत. मात्र पथिरानाच्या तुलनेत इकोनॉमी रेट जास्त आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, मयंक यादव.