IPL 2024 Purple Cap : युझवेंद्र चहलने खेचून घेतली पर्पल कॅप, चार सामन्यात मिळवल्या इतक्या विकेट्स
आयपीएल स्पर्धेत गेले काही दिवस पर्पल कॅप मुस्तफिझुर रहमानच्या डोक्यावर होती. मात्र गुजरात टायटन्सने मोहित शर्माने 7 गडी बाद करून हा मान मिळवला होता. मात्र ही मानाची कॅप युझवेंद्र चहलकडे आली आहे.
आयपीएल स्पर्धा खऱ्या अर्थाने फलंदाजांच्या बाजूने झुकलेली असते. त्यामुळे गोलंदाजांना तोंड दाबून बुक्यांचा मार पडत असतो. अशा संपूर्ण पर्वात पर्पल कॅप मिळवणं म्हणजे मोठा मान असतो. त्यामुळे पर्पल कॅप मिळावी अशी मनोमन इच्छा गोलंदाजांची असते. यासाठी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून शर्यत सुरु होती. मात्र चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या मुस्तफिझुर रहमानने 17 सामने हा मान मिरवला. त्यानंतर गुजरात टायटन्सच्या मोहित शर्माने मान खेचून घेतला. मात्र त्याच्या आनंद फार काळ टिकू शकला नाही. राजस्थान रॉयल्सच्या युझवेंद्र चहलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे दोन गडी बाद केले आणि हा मान मिळवला आहे. आता ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सुरु झाली आहे. प्रत्येक सामन्यानंतर हा मान इथे तिथे होताना दिसणार आहे. रविवार दोन सामने आहेत. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आणि दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात मोहित शर्माने दोन विकेट्स घेतले तर हा मान पुन्हा मोहितला मिळणार आहे.
राजस्थान रॉयल्सच्या युझवेंद्र चहल 4 सामने खेळला असून 8 विकेट आणि 6.35 च्या इकोनॉमी रेटसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सच्या मोहित शर्माने 4 सामन्यात 7 गडी बाद केले आहेत. तर इकोनॉमी रेट 8.18 इतका आहे. तिसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्सचा मुस्तफिझुर रहमान आहे. तीन सामन्यात 7 गडी बाद केले आहेत. तर इकोनॉमी रेट हा 8.83 इतका आहे. पण मुस्तफिझुल रहमान पासपोर्टच्या कामासाठी मायदेशी गेल्याने पुढच्या सामन्यात खेळणं कठीण आहे. त्यामुळे मागे पडत जाणार आहे.
चौथ्या स्थानावर लखनौ सुपर जायंट्सचा मयंक यादव आहे. आपल्या वेगाने मयंकने लक्ष वेधून घेतलं आहे. फक्त दोन सामन्यात मयंकने 6 गडी बाद केले आहेत. गुजरातविरुद्धच्या सामन्यात 2 गडी बाद करताच अव्वल स्थान गाठू शकतो. कारण सध्या त्याचा इकोनॉमी रेट हा 5.12 इतका आहे. पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा खलील अहमद आहे. त्याने 4 सामन्यात 6 गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनमी रेट हा 8.18 इतका आहे.