IPL 2024 Purple Cap: जसप्रीत बुमराहला मिळाला पुन्हा पर्पल कॅपचा मान, जाणून घ्या कोण कुठे ते

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : आयपीएल स्पर्धेत पर्पल कॅपची शर्यत एकदम रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामन्यानंतर हा मान बदलताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ही लढत आणखी चुरशीची होणार यात शंका नाही.

IPL 2024 Purple Cap: जसप्रीत बुमराहला मिळाला पुन्हा पर्पल कॅपचा मान, जाणून घ्या कोण कुठे ते
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 11:55 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत पर्पल कॅपची शर्यत रंगतदार होताना दिसत आहे.  कारण फलंदाजांच्या या स्पर्धेत गोलंदाजांचा निभाव लागणं कठीण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विकेट्स मिळवणं मोठ्या कष्टाचं काम झालं आहे. असं असूनही काही गोलंदाज चमकदार कामगिरी करत आहेत. प्रत्येक सामन्यात एखाद दोन विकेट्स घेत आपलं अस्तित्व दाखवत आहेत. शनिवारी पर्पल कॅपचा मान पंजाब किंग्सचा हर्षल पटेल याला मिळाला होता. मात्र मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात एक विकेट घेत हा मान जसप्रीत बुमराहला मिळाला आहे. जसप्रीत बुमराहचा इकोनॉमी रेट हा इतर गोलंदाजांपेक्षा खूपच चांगला आहे. त्यामुळे त्याच्याकडून कॅप खेचून जास्त काळ टिकवून ठेवणं कठीण आहे.

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 9 सामन्यात 36 षटकं टाकत 14 विकेट आणि 6.63 इकोनॉमी रेटसह पहिल्या स्थानी आहे. पंजाब किंग्सचा हर्षल पटेल 9 सामन्यात 32 षटकं टाकत 14 विकेट आणि 10.18 इकोनॉमी रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल 9 सामन्यात 34 षटकं टाकत 13 विकेट आणि 9 इकोनॉमी रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा मुकेश कुमार 7 सामन्यात 25.3 षटक टाकत 13 विकेट आणि 11.05 इकोनॉमी रेटसह चौथ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कुलदीप यादव 7 सामन्यात 27 षटकं टाकत 12 विकेट आणि 8.51 इकोनॉमी रेटसह पाचव्या स्थानी आहे.

रविवार मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगला. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 4 गडी गमवून 257 धावा केल्या. मात्र मुंबई इंडियन्सला 9 गडी गमवून 247 धावांपर्यंत मजल मारता आली.  दिल्लीने मुंबई इंडियन्सला 10 धावांनी पराभूत केलं. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 5 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने 19 षटकात पूर्ण केलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर कर्णधार), रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.