IPL 2024 Purple Cap: पंजाबविरुद्ध युझवेंद्र चहलचा सिक्का पुन्हा चालला, बुमराहकडून पर्पल कॅप घेतली खेचून
IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : आयपीएल 2024 स्पर्धेतील 27 वा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीचा प्रभाव पुन्हा दिसून आला. पर्पल कॅपचा मान युझवेंद्र चहलला मिळाला आहे.
आयपीएल स्पर्धेतील 27 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. हा सामना राजस्थान रॉयल्सने सहज जिंकला. राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच पंजाब किंग्सला 20 षटकात 8 गडी गमवून 147 धावा केल्या. विजयासाठी दिलेल्या 148 धावांचं आव्हान राजस्थान रॉयल्सने सहज गाठलं. पंजाब किंग्सला 147 धावांवर रोखण्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांचा सर्वात मोठा हात आहे. एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे धावसंख्या आटोक्यात राहिली. राजस्थान रॉयल्सकडून आवेश खानने 2, आवेश खानने 2, बोल्टने 1, कुलदीप सेनने 1 आणि युझवेंद्र चहलने 1 विकेट घेतली. युझवेंद्र चहलने 4 षटकात 31 धावा देत 1 गडी बाद केला. एक विकेट बाद करताच युझवेंद्र चहलच्या डोक्यावर पर्पल कॅप सजली आहे. मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांच्या विकेट जवळपास सारख्या होत्या. पण इकोनॉमी रेटने बुमराह पुढे असल्याने पर्पल कॅपचा मान जसप्रीत बुमराहला मिळाला होता. पण आता हा मान युझवेंद्र चहलला मिळाला आहे.
युझवेंद्र चहलने 6 सामन्यात 22 षटकं टाकत 163 धावा देत 11 विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी इकोनॉमी रेट हा 7.40 इतका आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आहे. त्याने 5 सामन्यात 20 षटकं टाकत 119 धावा दिल्या आणि 10 गडी बाद केले आहेत. रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना असणार आहे. त्यामुळे युझवेंद्र चहलची कॅप धोक्यातच आहे. बुमराहने दोन विकेट घेताच ही मानाची कॅप पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहकडे जाईल.
तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा मुस्तफिझुर रहमानने 4 सामन्यात 16 षटकं टाकली आहेत. यात 128 धावा देत 9 गडी बाद केले आहेत. चौथ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा खलील अहमद असून त्याने 6 सामन्यात 24 षटकं टाकत 9 गडी बाद केले आहेत. तर अर्शदीप सिंगने 6 सामन्यात 18.2 षटक टाकून 8 गडी बाद केले आहेत. पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंग पाचव्या स्थानावर आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.