दुष्काळात तेरावा महिना! IPL सुरू होण्याआधी मुंबई इंडिअन्स संघाला आणखी एक झटका, रोहितचं टेन्शन वाढलं
जसप्रीत बुमराह आपल्या पाठिच्या दुखापतीमुळे स्पर्धा खेळेल की नाही काही स्पष्ट झालं नाही. अशातच एक आणखी वाईट बातमी मुंबईच्या चाहत्यांसाठी आली आहे.
मुंबई : आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं बिगुल वाजलं असून येत्या 31 मार्चला पहिला सामना होणार आहे. गेल्या वर्षी ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडणार आहे. चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मात्र एक वाईट बातमी समोर आली आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडिअन्स संघाला संघाला स्पर्धा सुरू होण्याआधी जबरदस्त धक्का बसलेला आहे. आधीच भारताचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह आपल्या पाठिच्या दुखापतीमुळे स्पर्धा खेळेल की नाही काही स्पष्ट नाही. अशातच एक वाईट बातमी मुंबईच्या चाहत्यांसाठी आली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात समाविष्ट करण्यात आलेला वेगवान गोलंदाज झाई रिचर्ड्सन दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. ईएसपीएन क्रिकइनफोने दिलेल्या माहितीनुसार, झाई रिचर्ड्सन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडू शकतो. आधीच संघातील प्रमुख बॉलर बुमराच्या अनुपस्थितीमध्ये संघातील आणखी एक बॉलर दुखापती झाल्याने मुंबईसाठी दुष्काळामध्ये तेरावा महिना आल्यासारखं आहे.
झाई रिचर्ड्सन दुखापतीमुळे भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. झाई रिचर्ड्सन आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग आहे. मुंबई इंडियन्स आधीच जखमी खेळाडूंमुळे अडचणीत सापडली आहे. जसप्रीत बुमराह याला दुखापतीतून सावरण्यासाठी तीन ते चार महिने लागू शकतात. त्यामुळे जवळपास त्याचं यंदाच्या मोसमातून बाहेर पडणं निश्चित मानलं जात आहे.
मुंबईने यंदा झालेल्या लिलावामध्ये खरेदी केलेले खेळाडू – कॅमेरॉन ग्रीन (17.50 कोटी), झ्ये रिचर्डसन (1.50 कोटी), पियुष चावला (50 लाख), ड्वेन जॅन्सन (20 लाख), विष्णू विनोद (20 लाख), शम्स मुलानी (20 लाख), नेहल वढेरा (20 लाख) आणि राघव गोयल (20 लाख).