INDvsAUS | भारतीय फलंदाजाचा कारनामा, एकाच सामन्यात तुफानी द्विशतक आणि शतक

भारताच्या या युवा फलंदाजाने इतिहास रचला आहे. या खेळाडूने एकाच सामन्यात द्विशतक आणि शतक ठोकण्याचा कारनामा केला आहे.

INDvsAUS | भारतीय फलंदाजाचा कारनामा, एकाच सामन्यात तुफानी द्विशतक आणि शतक
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 4:57 PM

ग्वाल्हेर | टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून इंदूर कसोटीत 9 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाची अपयशी फलंदाज या पराभवाचे कारण ठरले. एकाबाजूला या फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. तर दुसऱ्या बाजूला भारतीय फलंदाजाने धमाका केला. या युवा बॅट्समनने एकाच सामन्यात द्विशतक आणि शतक ठोकण्याचा कारनामा करत इतिहास रचला. या बॅटरने या कामगिरीसह टीम इंडियाचे दरवाजे ठोठावले आहेत.

भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळताना मध्यप्रदेश विरुद्ध इराणी कपमध्ये हा कारमाना केला. यशस्वीने पहिल्या डावात बॅटिंग करताना द्विशतक केलं. तर दुसऱ्या डावात त्याने 144 धावांची खेळी केली.

यशस्वीने पहिल्या इनिंगमध्ये 259 बॉलमध्ये 30 चौकार आणि 3 खणखणीत सिक्सच्या मदतीने 82.84 च्या स्ट्राईक रेटने 213 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात यशस्वीने 157 बॉलमध्ये 144 धावांची खेळी केली. यात त्याने 16 फोर आणि 3 सिक्स ठोकले.

विक्रमवीर यशस्वी

यशस्वी या कामगिरीसह विक्रमवीर ठरला. यशस्वी इराणी कप स्पर्धेत पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात शतक ठोकणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. तसेच इराणी कपमध्ये 300 पेक्षा अधिक धावा करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड ‘गब्बर’ शिखर धवन याच्या नावावर होता. यशस्वीने गब्बरच्या या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

टीम इंडियात संधी मिळणार?

यशस्वीने या कामगिरीसह सर्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. तसेच त्याने टीम इंडियात संधी मिळण्यासाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. यशस्वीने आतापर्यंत 15 फर्स्ट क्लास सामन्यात 9 शतक आणि 3 द्विशतक ठोकले आहेत. यशस्वी सध्या ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, त्यानुसार यशस्वीला लवकरच टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळू शकते.

रेस्ट ऑफ इंडिया प्लेइंग इलेव्हन | मयंक अग्रवाल (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, यशस्वी जयस्वाल, बाबा इंद्रजीथ, यश धुळ, उपेंद्र यादव (विकेटकीपर), सौरभ कुमार, अतित शेठ, पुलकित नारंग, नवदीप सैनी आणि मुकेश कुमार.

मध्य प्रदेश प्लेइंग इलेव्हन | हिमांशू मंत्री (कॅप्टन आणि विकेटकीपर), अरहम अकिल, शुभम एस शर्मा, हर्ष गवळी, यश दुबे, अमन सोलंकी, सरांश जैन, अनुभव अग्रवाल, अंकित कुशवाह, कुमार कार्तिकेय आणि आवेश खान.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.