Irani Cup 2024 : रहाणे-गायकवाड आमनेसामने, इराणी कप स्पर्धेत 2 मराठमोळे कर्णधार भिडणार, जाणून घ्या सर्वकाही

Mumbai vs Rest Of India: इराणी ट्रॉफी 2024 या स्पर्धेसाठी मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया या दोन्ही संघाची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या सर्वकाही.

Irani Cup 2024 : रहाणे-गायकवाड आमनेसामने, इराणी कप स्पर्धेत 2 मराठमोळे कर्णधार भिडणार, जाणून घ्या सर्वकाही
ajinkya rahane and ruturaj gaikwad
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 11:52 PM

अजिंक्य रहाणे इराणी कप ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर रेस्ट ऑफ इंडिया संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही पुणेकर ऋतुराज गायकवाड याला देण्यात आली आहे. उभयसंघातील सामना 1 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम येथे होणार आहे. या सामन्यात 2 मराठमोळे कर्णधार आमनेसामने असणार आहेत. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबईने काही महिन्यांपूर्वी रणजी ट्रॉफी जिंकली होती. तर ऋतुराजने आपल्या नेतृत्वात टीम इंडिया एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलं. तसेच ऋतुराजने नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीतही नेतृत्व केलं होतं. त्यामुळे अनुभवी अजिंक्य रहाणेसमोर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाचा चांगलाच कस लागणार आहे.

अभिमन्यू ईश्वरन याला रेस्ट ऑफ इंडिया संघाचं उपकर्णधार करण्यात आलं आहे. तर ध्रुव जुरेल आणि इशान किशन या दोघांना विकेटकीपर म्हणून स्थान देण्यात आलं आहे. यश दयाल याचाही समावेश करण्यात आला आहे. ध्रुव आणि यश या दोघांनी बांगलादेश विरूद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यासाठीही निवड करण्यात आली आहे. मात्र तिथे त्यांना संधी देण्यात येणार नसल्याचं निश्चित असल्याने त्यांची इथे निवड केली गेली आहे. इंडिया-बांगलादेश यांच्यातील दुसरा आणि अंतिम सामना हा 27 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.

तसेच सरफराज खान याला बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या कसोटीतील प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी न मिळाल्यास त्याला या स्पर्धेत स्थान दिलं जाऊ शकतं. तर दुसऱ्या बाजूला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकुर या दोघांना संधी दिली आहे. पृथ्वी शॉ आणि मुशीर खान हे दोघे मुंबईसाठी ओपनिंग करण्याची शक्यता आहे. तसेच शिवम दुबे याला भारतीय संघातून मुक्त केल्यास त्याचाही इराणी ट्रॉफीत समावेश केला जाऊ शकतो.

दरम्यान उभयसंघातील हा सामना 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. हा सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल. तर टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर मॅच पाहायला मिळेल.

इराणी कप स्पर्धेसाठी रेस्ट ऑफ इंडिया टीम : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), अभिमन्यू इश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडीक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर)*, इशान किशन (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, प्रसीध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल *, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद आणि राहुल चहर.

इराणी कप स्पर्धेसाठी मुंबई टीम: अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सिद्धांत अद्धतराव, शम्स मुलानी, तनुश कोटीयन, हिमांशु सिंह, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी आणि मोहम्मद जुनेद खान.

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.