INDvsAUS | इंदूर कसोटीआधी टीम जाहीर, या खेळाडूला कर्णधारपदाची जबाबदारी
बुधवारी 1 मार्च रोजी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्ऱॉफीतील तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे. त्यासोबत रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यतही मॅच होणार आहे.
मुंबई | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीत आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. टीम इंडिया 2021 नंतर सलग दुसऱ्यांदा बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडिया या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 2-0 ने पुढे आहे.तर मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा 1-5 मार्चमध्ये इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाला इंदूर कसोटी जिंकल्यास मालिका जिंकेल. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातही पोहचेल.
या बॉर्डर गावसकर ट्रॉफीदरम्यान इरानी कपसाठी रेस्ट ऑफ इंडिया टीमची घोषणा करण्यात आली आहे. रेस्ट ऑफ इंडिया टीमच्या कर्णधारपदाची सूत्र मयंक अग्रवाल याला देण्यात आली आहेत.
मध्य प्रदेश 2021-22 या रणजी ट्रॉफी चॅम्पियन राहिली आहे. मयंक अग्रवाल मध्य प्रदेश विरुद्ध 16 सदस्यीय रेस्ट ऑफ इंडियाचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघात 1-5 मार्च दरम्यान हा सामना कॅप्टन रुपसिंह स्टेडियम ग्वाल्हेर इथे खेळवण्यात येणार आहे. हा सामनाही 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.
दरम्यान दुखापतीमुळे सरफराज खान याला इराणी कपला मुकावं लागलं आहे. सरफराज याच्या अंगठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध नाही. सरफराजच्या जागी बाबा इंद्रजीत याची निवड करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. तसेच मयंक मार्कंडेच्या जागी शम्स मुलानीचा समावेश करण्यात आला आहे.
रेस्ट ऑफ इंडिया टीम | मयंक अग्रवाल (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन, यशस्वी जायसवाल, यश ढुल, बाबा इंद्रजीत, उपेंद्र यादव (विकेटकीपर), अतीत सेठ, सौरभ कुमार, हार्विक देसाई, नवदीप सैनी, मुकेश कुमार, चेतन सकारिया, आकाश दीप, शम्स मुलानी, पुलकित नारंग आणि सुदीप कुमार घरामी.
टीम मध्य प्रदेश | हिमांशु मंत्री (कॅप्टन), रजत पाटीदार, यश दुबे, हर्ष गवली, शुभम शर्मा, वेंकटेश अय्यर, अक्षत रघुवंशी, अमन सोलंकी, कुमार कार्तिकेय, सारांश जैन, आवेश खान, अंकित कुशवाह, गौरव यादव, अनुभव अग्रवाल आणि मिहिर हिरवानी.