Irani Cup : अभिमन्यू इश्वरन-ध्रुव जुरेल सर्वाधिक धावा करुनही दुर्देवी, नक्की काय झालं?
Mumbai vs Rest of India Irani Trophy: मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडियाच्या अभिमन्यू इश्वरन आणि ध्रुव जुरेल या दोघांनी धमाकेदार खेळी केली. मात्र दोघेही दुर्देवी ठरले.
इराणी कप स्पर्धेत मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया आमनेसामने आहेत. या सामन्यात मुंबईच्या सर्फराज खान याने पहिल्या डावात द्विशतकी खेळी करत धमाका केला. सर्फराजने नाबाद 222 धावांची खेळी केली. सर्फराजच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 537 धावा केल्या. त्यानंतर रेस्ट ऑफ इंडियाच्या अभिमन्यू ईश्वरन आणि ध्रुव जुरेल या जोडीने धमाका केला. या दोघांनी केलेल्या खेळीमुळे रेस्ट ऑफ इंडियाला ऑलआऊट 416 धावांपर्यंत मजल मारता आली. रेस्ट ऑफ इंडियाकडून अभिमन्यू आणि ध्रुव या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. मात्र त्यानंतरही हे दोघे दुर्देवी ठरले.
अभिमन्यू आणि ध्रुव या दोघांनी केलेल्या या खेळीमुळे मुंबईला 150+ धावांची आघाडी मिळाली नाही. मात्र इतकी मोठी खेळी करुनही हे दोघे दुर्देवी ठरले. अभिमन्यू द्विशतकापासून वंचित राहिला तर ध्रुवचं शतक हुकलं. अभिमन्यू ईश्वरन याचं द्विशतक अवघ्या 9 धावांनी हुकलं. तर ध्रुव जुरेल नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. ध्रुव जुरेलचं शतक 7 धावांनी हुकलं. या दोघांना मुंबईच्या शम्स मुलानी याने सलग 2 षटकांमध्ये बाद केलं. शम्सने ध्रुवला बाद करत मुंबईसाठी डोकेदुखी ठरत असलेली ही जोडी फोडली. ध्रुवने 121 बॉलमध्ये 13 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 93 रन्स केल्या. अभिमन्यू आणि ध्रुव या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 165 रन्सची पार्टनरशीप केली.
त्यानंतर शम्सने 103 व्या ओव्हरमध्ये अभिमन्यू ईश्वरन याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. शम्सने लेग साईडला टाकलेल्या बॉलवर अभिमन्यूने स्वीप शॉट मारला. मात्र अभिमन्यूने मारलेला शॉट फाईन लेगवर असलेल्या तनुष कोटीयनच्या दिशेने गेला. तनुषने अचूक कॅच घेतला. अभिमन्यूने आऊट झाल्यानंतर संताप व्यक्त केला. अभिमन्यू स्वत:वर नाराज असल्याचं त्याच्या संतापातून पाहायला मिळालं. अभिमन्यूने 292 बॉलमध्ये 16 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 191 धावा केल्या.
अभिमन्यूचं द्विशतक हुकलं
HUGE Wicket Alert 🚨
Shams Mulani gets the big wicket of Abhimanyu Easwaran (191), who misses out on his double ton by 9 runs!
A magnificent innings from Easwaran 👏
2 wickets in 2 overs for Mulani 🙌#IraniCup | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/Er0EHGOZKh pic.twitter.com/U4XQot1FeV
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 4, 2024
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सरफराज खान, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि एम जुनेद खान.
रेस्ट ऑफ इंडिया प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, इशान किशन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, यश दयाल, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.