Ireland Tour 2023 | आयर्लंड दौऱ्यासाठी टीम जाहीर, कुणाला संधी कुणाला डच्चू?
Ireland Tour 2023 | आयर्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम मॅनेजमेंटने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
डब्लिन | टीम इंडिया जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 जुलै रोजी होणार आहे. विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर 3 मॅचची वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. या टेस्ट आणि वनडे सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आलाय. मात्र विंडिज दौऱ्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी टीमची घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच टी 20 संघ जाहीर करण्यात येणार आहे. टीम इंडिया विंडिज विरुद्धच्या या टी 20 मालिकेनंतर आयर्लंड दौरा करणार आहे.
टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या टी 20 मालिकेचं वेळापत्रक 27 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलं. आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांची टी 20 मालिका ऑगस्ट महिन्यात अनुक्रमे 18, 20 आणि 23 तारखेला खेळवण्यात येणार आहे. या टी 20 मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे.
या दरम्यान आता आयर्लंड दौऱ्यसाठी ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम जाहीर करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात ही वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. एलिसा हिली आयर्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे.
आयर्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी वूमन्स ऑस्ट्रेलिया टीम
SQUAD: Following the #Ashes, our @AusWomenCricket team will be stopping over in Ireland for a three-match ODI series!
Megan Schutt will be rested, while Heather Graham will remain in England and link up with the Australian squad at the conclusion of the Australia A series. pic.twitter.com/SxeifNCqOw
— Cricket Australia (@CricketAus) June 30, 2023
आयर्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना, आयर्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, रविवार 23 जुलै, कास्टव एव्हेन्यू.
दुसरा एकदिवसीय सामना, आयर्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मंगळवार 25 जुलै, कास्टव एव्हेन्यू.
तिसरा एकदिवसीय सामना, आयर्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शुक्रवार 28 जुलै, कास्टव एव्हेन्यू.
आयर्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम ऑस्ट्रेलिया
एलिसा हिली (कॅप्टन), डार्सी ब्राऊन, ऍशले गार्डनर, किम गार्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, फोबी लिचफील्ड, ऍनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, एलिस पेरी, बेथ मूनी आणि ताहलिया मॅकग्रा.
दरम्यान ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. वूमन्स ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर एकमेव कसोटी सामन्यात 89 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर 1 ते 8 जुलै दरम्यान 3 सामन्यांची टी 20 मालिका आयोजित करण्यात आली आहे. यानंतर 12 ते 18 जुलै दरम्यान इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे सीरिज होणार आहे.