IND vs IRE 1st T20I | पावसामुळे ‘गेम ओव्हर’, टीम इंडियाचा 2 धावांनी विजय
IRE vs IND 1st T20I Rain | टीम इंडियाने आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत विजयी सुरुवात केली आहे.
डब्लिन | टीम इंडियाने आयर्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी 20 सामना डकवर्थ लुईस नियमांनुसार 2 धावांनी जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आयर्लंड पहिले बॅटिंग करुन टीम इंडियासमोर 140 धावांचं आव्हान ठेवलं. टीम इंडियाने 6.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 47 धावा केल्या. मात्र तेव्हा पाऊस आला आणि खेळ थांबवावा लागला. पावसाच्या थांबण्याची प्रतिक्षा पाहिली गेली. मात्र पाऊस काही थांबेना. त्यामुळे अखेर दोन्ही कर्णधारांच्या सामंजस्याने आणि डीएलएस या नियमानुसार सामन्याचा निकाला लावण्यात आला. त्यानुसार टीम इंडिया 2 धावांनी हा सामना जिंकला.
टीम इंडियाची विजयी सुरुवात
The two captains shake hands as the play is called off due to incessant rains.#TeamIndia win by 2 runs on DLS.
Scorecard – https://t.co/G3HhbHPCuI…… #IREvIND pic.twitter.com/2v5isktP08
— BCCI (@BCCI) August 18, 2023
सामन्याचा धावता आढावा
टीम इंडियाने टॉस जिंकला. आयर्लंडला बॅटिंगसाठी आमंत्रण देणं गेलं. आयर्लंडची सुरुवातीला दाणदाण झाली. टीम इंडियाने आयर्लंडला झटके दिले. मात्र त्यानंतर आयर्लंडने जोरदार मुसंडी मारली. बॅरी मॅककार्थी याच्या अर्धशतकाच्या जोरावर आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 139 धावा केल्या. बॅरी मॅककार्थी याने आयर्लंडकडून सर्वाधिक 51 धावा केल्या.
बॅरीने 33 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 51 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिश्नोई या तिघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंह याने 1 विकेट घेतली.
टीम इंडिया 140 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आली. यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी आश्वासक सुरुवात केली. दोघांनी 46 धावांची भागीदारी केली. त्यानंतर यशस्वी 24 धावांवर आऊट झाला. पुढच्याच बॉलवर म्हणजेच सहाव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर तिलक वर्मा झिरोवर कॅच आऊट झाला. पुढे आणखी 2 बॉल टाकले गेले. त्यानंतर पावसाची एन्ट्री झाली. पावसामुळे खेळ थांबला. टीम इंडियाचा स्कोअर 6.5 ओव्हरमध्ये 2 बाद 47 असा झाला. मात्र अखेर डीएलएसनुसार टीम इंडिया विजयी ठरली.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | जसप्रीत बुमराह (कॅप्टन) ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.
आयर्लंड प्लेईंग इलेव्हन | पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.