Jasprit Bumrah | जसप्रीत बुमराह होणार टीम इंडियाचा कॅप्टन! जाणून घ्या

Team India Captaincy | जसप्रीत बुमराह हा गेल्या अनेक महिन्यांपासून दुखातीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र आता बुमराहला कमबॅकसह कर्णधार मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Jasprit Bumrah | जसप्रीत बुमराह होणार टीम इंडियाचा कॅप्टन! जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 8:00 PM

मुंबई | कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया आता वनडे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होतेय. त्यानंतर उभयसंघात टी 20 मालिका पार पडणार आहे. टी 20 मालिकेने विंडिज दौऱ्याची सांगता होणार आहे. टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात आयर्लंड दौरा करणार आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती तर युवांना संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे आयर्लंड विरुद्ध टीम इंडियाचा कॅप्टन कोण असणार असा सवाल क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

टीम इंडियातून दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह हा बाहेर आहे. बुमराह अनेक महिन्यांनंतर आयर्लंड विरुद्ध कमबॅक करु शकतो. त्यामुळे बुमराह याला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार जसप्रीत बुमराह हा कॅप्टन होऊ शकतो.

विंडिज दौऱ्यांतर एक कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे.या कॅम्पमध्ये आशिया कप स्पर्धेसाठी संधी देण्यात आलेल्या खेळाडूंनी सहभागी व्हावं, अशी इच्छा हेड कोच राहुल द्रविड यांची आहे. त्यामुळे या कॅम्पमध्ये जसप्रीत बुमराह सहभागी होऊ शकतो. त्यामुळे या कॅम्पमध्ये निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटला बुमराहच्या कामगिरीचं आणि त्याच्या दुखापतीचं आकलन करता येईल.

हे सुद्धा वाचा

आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या खेळाडूंची तयारी व्हावी, या हेतूने हेड कोच द्रविडने कॅम्पचं आयोजन करण्याचा सल्ला दिलाय. या कॅम्पला 24-25 ऑग्स्टपासून सुरुवात होऊ शकते. आशिया कप स्पर्धा 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. हा सामना 2 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कॅम्पमुळे टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफला आयर्लंड दौऱ्यातील टी 20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया आता विंडिज विरुद्ध वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर आशिया कप आणि वर्ल्ड कप स्पर्धा आहे. हार्दिक पंड्या गेल्या अनेक मालिकांपासून टीम इंडियाच्या टी 20 संघाचं कर्णधारपद सांभाळतोय. हार्दिक सातत्याने खेळतोय. त्यात आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कप तोंडावर आहे. त्यामुळे हार्दिकला आयर्लंड दौऱ्यात विश्रांती देण्यात येऊ शकते. त्यामुळे जसप्रीत बुमराहला कमबॅकसह कर्णधारपद मिळू शकतं.

आयर्लंड-टीम इंडिया टी 20 मालिका वेळापत्रक

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, 18 ऑगस्ट.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, 20 ऑगस्ट.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, 23 ऑगस्ट.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.