IRE vs IND 2nd T20i | ऋतुराजचं अर्धशतक, रिंकू-शिवमचा तडाखा, आयर्लंडला 186 धावांचे आव्हान
Ireland vs India 2nd T20I | टीम इंडियाने आयर्लंडसाठी असलेल्या 'करो या मरो' सामनयात 186 रन्सचं टार्गेट दिलं आहे.
डब्लिन | ऋतुराज गायकवाड याचं अर्धशतक, रिंकू सिंह आणि शिवम दुबे या दोघांच्या फिनिशिंग टचच्या जोरावर टीम इंडियाने आयर्लंडला विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 185 धावा केल्या. तिलक वर्मा याचा अपवाद वगळता टीम इंडियाकडून सर्वांनीच चांगलीच कामगिरी केली. टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. तर शेवटी रिंकू सिंह आणि शिवम दुबे या दोघांची जोरदार फटकेबाजी करत टीम इंडियाचा स्कोअर 180 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली.
टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल याने 18 धावा केल्या. तिलक वर्मा याला 1 धावच करता आली. ऋतुराज याने 43 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. संजू सॅमसनही आज चांगल्या रंगात होता. संजूने 26 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने 40 रन्स केल्या.
आयर्लंडसमोर 186 धावांचं आव्हान
Innings Break!
After being put to bat, #TeamIndia post a total of 185/5.
Ruturaj Gaikwad top scored with 58 runs.
Scorecard – https://t.co/I2nw1YQmfx…… #IREvIND pic.twitter.com/QRMPtkKIWs
— BCCI (@BCCI) August 20, 2023
रिंकू सिंह-शिवम दुबे जोडीचा फिनिशिंग टच
रिंकू सिंह आणि शिवम दुबे या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 55 धावांची तोडफोड भागीदारी केली. रिंकूने 21 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्ससह 38 धावा केल्या. तर शिवमने 2 सिक्ससह 16 बॉलमध्ये 22 रन्स केल्या. आयर्लंडकडून बॅरी मॅककार्थी याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर क्रेग यंग, बेंजामिन व्हाइट आणि मार्क अडायर या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | जसप्रीत बुमराह (कॅप्टन) ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.
आयर्लंड प्लेईंग इलेव्हन | पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.