Ind vs Ire 1st T20I | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20 सामना कुठे आणि कधी पाहता येणार?

Ireland vs India 1st T20i Live Streaming | आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेला शुक्रवार 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार हे जाणून घ्या.

Ind vs Ire 1st T20I | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20 सामना कुठे आणि कधी पाहता येणार?
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 10:14 PM

डब्लिन | आशिया कप 2023 आधी टीम इंडियाची युवा ब्रिगेड आयर्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा 18 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. जसप्रीत बुमराह या यंग ब्रिगेडचा कॅप्टन आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा 2-3 अशा फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे आता टीम इंडियासमोर आयर्लंड विरुद्ध चांगली कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाने गेल्याने वर्षी आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका जिंकली होती. दरम्यान आता या 3 सामन्यांच्या मालिकेनिमित्त पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येणार, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिली टी 20 मॅच केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिला टी 20 सामना हा 18 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिल्या टी 20 सामन्याचं आयोजन कुठे?

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20 सामना हा द व्हिलेज, डब्लिन इथे आयोजित करण्यात आला आहे.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिल्या टी 20 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20 सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल? (IRE vs IND 1st t20i Digital Streaming)

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20 सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20 सामना हा टीव्हीवर कुठे पाहता येणार?  (IRE vs IND 1st t20i Live Streaming)

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20 सामना हा टीव्हीवर स्पोर्ट्स 18 या चॅनेलवर पाहायला मिळेल.

टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.