IRE vs IND | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने, आकडेवारी कुणाची भारी?
india vs ireland t20i head to head | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेची सुरुवात 18 ऑगस्टपासून होत आहे.
डब्लिन | आशिया कपआधी टीम इंडिया अखेरची टी 20 मालिका आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही टी 20 मालिका आहे. या मालिकेला 18 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. जसप्रीत बुमराह याला पहिल्यांदाच टीम इंडियाची कॅप्टन्सी देण्यात आली आहे. तर पॉर्ल डब्लिन हा आयर्लंडचं कर्णधारपद सांभाळणार आहे. उभयसंघातील पहिला सामना हा उद्या शुक्रवार 18 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. त्याआधी आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया या दोघांपैकी सरस कोण आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.
आकडेवारी कुणाच्या बाजूने (IRE vs IND T20I Head To Head)
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आतापर्यंत एकूण 5 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. या 5 सामन्यांमध्ये टीम इंडियाच वरचढ राहिली आहे. या पाचही सामन्यात टीम इंडियाचाच विजय झाला आहे. या 5 पैकी 4 सामने हे आयर्लंड आणि उर्वरित 1 सामना हा त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात आला होता.
टीम इंइिया आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज
Doublin’ the intensity in Dublin ft. #TeamIndia 😎#IREvIND pic.twitter.com/xcOzf2e0oO
— BCCI (@BCCI) August 16, 2023
टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.
आयर्लंड टीम इंडिया टी 20 मालिकेचं वेळापत्रक
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, 18 ऑगस्ट.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, 20 ऑगस्ट.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, 23 ऑगस्ट.