IRE vs NZ : 6 चेंडू, 20 धावा आणि फक्त एक विकेट बाकी, एक दिवसीय सामन्यात जे कधीच नाही घडलं, ब्रेसवेलनं नेमकं काय केलं?
Michael Bracewell : 49 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या 9 बाद 281 अशी होती. अशा स्थितीत त्यांना शेवटच्या षटकात विजयासाठी 20 धावा करायच्या होत्या आणि एक विकेट हातात होती.
नवी दिल्ली : पहिल्या एकदिवसीय सामन्यात मायकेल ब्रेसवेलने (Michael Bracewell) कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिल्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडनं (New Zealand) पहिल्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंड संघाचा (Ireland) एका विकेटने पराभव केला. शेवटच्या षटकात न्यूझीलंड संघाला विजयासाठी 20 धावा करायच्या होत्या आणि फक्त एक विकेट हातात होती. ब्रेसवेलने शेवटच्या षटकातील पहिल्या 5 चेंडूत 24 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. हॅरी टेक्टरच्या शतकाच्या जोरावर यजमान आयर्लंडने प्रथम खेळताना 9 गड्यांच्या मोबदल्यात 300 धावांची संघर्षपूर्ण धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 120 धावांवर 5 विकेट गमावल्या. पण 12व्या क्रमांकावर उतरलेल्या ब्रेसवेलने विजय मिळवत इतिहास रचला. 49 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या 9 बाद 281 अशी होती. अशा स्थितीत त्यांना शेवटच्या षटकात विजयासाठी 20 धावा करायच्या होत्या आणि एक विकेट हातात होती.
50 वे षटक वेगवान गोलंदाज क्रेग यंग गोलंदाजीसाठी आला. ब्रेसवेलने पहिल्या चेंडूवर शॉर्ट फाईन लेगवर चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर शॉर्ट फाईन लेग आणि स्क्वेअर लेगमध्ये चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर त्याने डीप मिडविकेटवर षटकार खेचून न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.
हायलाईट्स
- 49 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या 9 बाद 281 होती
- शेवटच्या षटकात विजयासाठी 20 धावा करायच्या होत्या
- एक विकेट हातात होती
- 50 वे षटक वेगवान गोलंदाज क्रेग यंग गोलंदाजीसाठी आला
- ब्रेसवेलने पहिल्या चेंडूवर शॉर्ट फाईन लेगवर चौकार मारला
- दुसऱ्या चेंडूवर शॉर्ट फाईन लेग आणि स्क्वेअर लेगमध्ये चौकार मारला
- तिसऱ्या चेंडूवर त्याने डीप मिडविकेटवर षटकार खेचून न्यूझीलंडला विजय मिळवून दिला
3 चेंडूत 6 धावा
3 चेंडूत सहा धावा करायच्या होत्या. किवी संघानं पहिल्या चेंडूवर 14 धावा केल्या. आता त्यांना शेवटच्या 3 चेंडूत 6 धावा करायच्या होत्या. चौथ्या चेंडूवर मायकेल ब्रेसवेलनं डीप स्क्वेअर लेगवर चौकार ठोकला. त्यानंतर 31व्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. तो 82 चेंडूत 127 धावा करून नाबाद राहिला. 10 चौकार आणि 7 षटकार मारले. नॉन स्ट्राइक एंडला उभ्या असलेल्या ब्लेअर टिकनरला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही.
इतिहासात प्रथमच
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने 50 व्या षटकात 20 किंवा अधिक धावा देऊन सामना जिंकला. यापूर्वी हा विक्रम 18 धावांचा होता. इंग्लंडनं 1987 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पराक्रम केला होता. याआधी आयर्लंडचा 22 वर्षीय युवा फलंदाज हॅरी टेक्टरनं वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावलं. त्यानं 117 चेंडूत 113 धावा केल्या. 14 चौकार आणि 3 षटकार मारले.