Pat cummins | खरच पॅट कमिन्स 20 कोटी रुपयाच्या लायक आहे का? T20 मध्ये कसा आहे त्याचा परफॉर्मन्स?

| Updated on: Dec 20, 2023 | 12:56 PM

Pat cummins | सनरायजर्स हैदराबादने पॅट कमिन्सला विकत घेण्यासाठी जोरदार लढत दिली. कमिन्सला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने सुद्धा जोरदार प्रयत्न केले. पण हैदराबादने बाजी मारली. कमिन्स एक मोठ नाव आहे. नुकतच त्याच्या नेतृत्वाखील ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्ड कप जिंकला.

Pat cummins | खरच पॅट कमिन्स 20 कोटी रुपयाच्या लायक आहे का? T20 मध्ये कसा आहे त्याचा परफॉर्मन्स?
Pat Cummins
Image Credit source: AFP
Follow us on

IPL Auction 2024 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुढच्या सीजनसाठी झालेला लिलाव अनेक अर्थांनी आश्चर्यकारक ठरला. कमाईचे सर्व रेकॉर्ड या लिलावात मोडले गेले. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपये मोजून कोलकाता नाइट रायडर्सने विकत घेतलं. स्टार्क आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सलाही भरपूर पैसा मिळाला. त्याला सनरायजर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपये मोजून विकत घेतलं. कमिन्स टेस्टमधील शानदार गोलंदाज आहे. वनडेमध्येही चांगला परफॉर्मन्स आहे. पण T20 मध्ये कामगिरी काही खास नाहीय, मग SRH ने कमिन्ससाठी इतके पैसे का मोजले?

आयपीएलच्या T20 फॉर्मेटमध्ये इतकी रक्कम घेण्यासाठी पॅट कमिन्स खरच योग्य आहे का?. SRH ने त्याला विकत घेण्यासाठी संघर्ष केला. मुंबई इंडियन्सनेही कमिन्सला विकत घेण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण हैदराबादने बाजी मारली. कमिन्स एक मोठ नाव आहे. आपल्या नेतृत्वाखाली त्याने ऑस्ट्रेलियाला वनडे वर्ल्ड कप जिंकवून दिला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताबही मिळवून दिला आहे.

इतके तर हे आकडे नक्कीच समाधानकारक नाहीत

टेस्टमध्ये कमिन्सच्या नावावर 56 सामन्यात 242 विकेट आहेत. वनडेमध्ये 88 मॅचमध्ये 141 विकेट घेतलेत. पण T20 मध्ये कमिन्स काही खास करु शकलेला नाही. T20 मध्ये कमिन्स 50 सामने खेळलाय. त्यात त्याने 55 विकेट घेतल्यात. त्याची सरासरी 24.54 आहे. T20 मध्ये हे आकडे जास्त समाधानकारक नाहीयत. 20 कोटी पेक्षा त्याला जास्त रक्कम मिळावी, इतके तर हे आकडे नक्कीच समाधानकारक नाहीयत.

IPL मध्ये किती विकेट घेतलेत?

कमिन्सचे आयपीएलमधील आकडे सुद्धा जास्त प्रभावी नाहीयत. कमिन्सने 42 आयपीएल सामन्यात 45 विकेट घेतलेत. आयपीएलमध्ये कमिन्सच्या गोलंदाजीची सरासरी 30.16 आहे. कमिन्स आयपीएलमध्ये सलग खेळलेला नाहीय. फक्त एकाच सीजनमध्ये तो 14 सामने खेळला होता. 2020 च्या सीजनमध्ये तो इतके सामने खेळलेला. म्हणजे तो आयपीएलसाठी उपलब्ध असतो का? यावर प्रश्नचिन्ह आहे. कमिन्स नोव्हेंबर 2022 पासून कुठलाही T20 इंटरनॅशनल सामना खेळलेला नाहीय.