Isham Kishan : इशान किशन याचा फ्लाइटमधील ‘तो’ फोटो व्हायरल, नेमकी कोणाच्या खांद्यावर घेतोय साखरझोप?

सोशल मीडियावर एक फोटो व्हायर होत आहे त्यामध्ये ईशान किशन फ्लाइटमध्ये झापलेला असून कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवलेलं आहे. ईशानचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

Isham Kishan : इशान किशन याचा फ्लाइटमधील 'तो' फोटो व्हायरल, नेमकी कोणाच्या खांद्यावर घेतोय साखरझोप?
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 12:49 AM

मुंबई : आयपीएलमधील मुंबई इंडिअन्स संघ आता हंगामाच्या अर्ध्यानंतर मुसंडी मारताना दिसत आहे. गेल्या सामन्यामध्ये मुंबई इंडिअन्स संघाने पंजाब किंग्स संघावर विजय मिळवत पॉइंट टेबलमध्ये मुसंडी मारली. या सामन्यामध्ये मुंबईचा ओपनर ईशान किशन याने आक्रमक अर्धशतक करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अशातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे त्यामध्ये ईशान किशन फ्लाइटमध्ये झापलेला असून कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवलेलं आहे. ईशानचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

पाच वेळचा चॅम्पियन असलेला संघ मुंबई इंडियन्सने बुधवारी आयपीएल-2023 सामन्यात पंजाब किंग्जचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या दणदणीत विजयात युवा यष्टीरक्षक ईशान किशनने 41 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 75 धावा केल्या होत्या.

फोटोमध्ये नेमकं कोण?

ईशान किशन फ्लाइटमध्ये सीटवर झोपलेला दिसत आहे. तिलक वर्माच्या खांद्यावर त्याने डोके ठेवलेलं आहे. मुंबई इंडिअन्सने ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये, चंदीगड ते चेन्नई, लांब प्रवास, सर्वोत्तम कंपनी, असं म्हटलं आहे.

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल (IPL-2023) च्या चालू हंगामात बुधवारी आपला पाच वा विजय नोंदवला. या विक्रमी पाच वेळा चॅम्पियन संघाने मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. पंजाबने 20 षटकांत 3 गडी गमावून 214 धावा केल्या, त्यानंतर मुंबईने 18.5 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. ईशानशिवाय सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक झळकावलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.