IPL : “बॉलिंगचं स्पीड इतकं हवं की…”, उमरान मलिकला दिग्गज क्रिकेटपटूने दिला असा सल्ला

आयपीएलचा यंदाचा हंगाम 31 मार्चला सुरू होणार आहे. मात्र त्याआधी भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने उमरान मलिक याला एक खास सल्ला दिला आहे.

IPL : बॉलिंगचं स्पीड इतकं हवं की..., उमरान मलिकला दिग्गज क्रिकेटपटूने दिला असा सल्ला
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 6:47 PM

मुंबई :काश्मीर एक्सप्रेस’ म्हणून ओळखला जाणारा भारताचा युवा खेळाडू उमरान मलिककडे संघाचा भविष्यातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून पाहिलं जातं. आयपीएलमध्ये आपल्या वेगाने या खेळाडूने सर्वांची मनं जिंकली आहेत. उमरानला भारतीय संघाकडून संधीसुद्धा देण्यात आली. मात्र त्याला अपेक्षित अशी कामगिरी करता आला नाही. आयपीएलचा यंदाचा हंगाम 31 मार्चला सुरू होणार आहे. मात्र त्याआधी भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने उमरान मलिक याला एक खास सल्ला दिला आहे.

धावा जास्त जात असतील तर काही फरक पडत नाही. तुमचं काम धावा वाचवणं इतकं नाहीच तर खेळाडूंना बादही करायचं आहे. बॉल येण्याआधी  बॅटींग करणाऱ्या खेळाडूला आपले डोळे बंद करावे लागले पाहिजेत ते पण एकदा नाहीतर दोनदा. अशा प्रकारचा आत्मविश्वास त्याला कोणीतरी द्यायला हवा, असं ईशांत शर्माने सांगितलं.

उमरान मलिक याची चिंता करायची गरज नाही. उमरान जितके जास्त सामने खेळणार तेवढा त्याला अनुभव येईल. आता तो किती जास्त वेगाने चेंडू टाकतो हे महत्त्वाचं आहे. जर आता त्याने चेंडू 150 आणि 160 ताशी वेगाने फेकला तर काही फरक पडत नसल्याचं ईशांत म्हणाला.

दरम्यान, आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना उमरानने खतरनाक गोलंदाजी केली होती. मागील मोसमात त्याने 14 सामने खेळले त्यामध्ये 20.18 च्या सरासरीने त्याने 22 विकेट्स घेतल्या. यातील त्याचं सर्वोत्तम प्रदर्शन हे 5/25 असं होतं. 2022 हा त्याचा दुसराच सीझन होता.

उमरान मलिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात फास्ट चेंडू टाकण्याच्या यादीमध्ये तो अव्वल स्थानावर आहे. 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या T20I दरम्यान त्याने 155 किमी प्रतितास वेगाने बॉल टाकत विक्रम केला होता. आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी उमरान मलिक याचा विचार केला जात आहे. त्यालाही संघात आपलं स्थान भक्कम करण्यासाठी यंदाच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.