DC vs KKR : दिल्लीच्या ताफ्यात ‘तो’ खेळाडू तब्बल 719 दिवसांनी परतला, टीम इंडियामध्ये असतो फिक्स!
आजच्या सामन्यात दिल्लीने एका दिग्गज खेळाडूला संधी दिली. या खेळाडूने 2 मे 2021 रोजी शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. या दिग्गज खेळाडूला तब्बल 719 दिवसांनी प्लेइंग-11 मध्ये संधी मिळाली आहे.
मुंबई : दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आयपीएलमधील 28 वा सामना सुरू आहे. यामध्ये प्रथम केकेआरेने बॅटिंग करत दिल्ली संघासाठी 128 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. दिल्लीने यंदाच्या सीझनमध्ये आपला पहिला विजय मिळवला नाही. आजच्या सामन्यात दिल्लीने एका दिग्गज खेळाडूला संधी दिली. या खेळाडूने 2 मे 2021 रोजी शेवटचा आयपीएल सामना खेळला होता.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ईशांत शर्मा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो दिल्ली संघाचा भाग आहे. मात्र या दिग्गज खेळाडूला तब्बल 719 दिवसांनी प्लेइंग-11 मध्ये संधी मिळाली आहे. या मोसमातही दिल्ली संघाने आता सहाव्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी दिली आहे. ईशांतने आजच्या सामन्यामध्ये 4 ओव्हर्समध्ये 19 धावा देत 2 गडी बाद करत महत्त्वाची भूमिका बजावली.
ईशांत शर्माने आयपीएलमध्ये 94 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 73 विकेट्स घेतल्या आहेत. 12 धावांत 5 विकेट्स हा त्याचा सर्वोत्तम स्पेल आहे. इशांतने 18 फेब्रुवारी 2008 रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पदार्पण केले. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात इशांत शर्माने 3 षटकात 7 धावा देत 1 बळी घेतला.
केकेआरची बॅटिंग
केकेआरला दिल्ली कॅपिट्ल्सच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट 127 धावाच करता आल्या. केकेआरकडून ओपनर जेसन रॉय याने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तर आंद्रे रसेल याने 38 धावांचं योगदान दिलं. मनदीप सिंह याने 12 धावांचं योगदान दिलं. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. वरुण चक्रवर्ती याने नाबाद 1* रन केली. दिल्ली कॅपिट्ल्सकडून इशांत शर्मा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, एनरिच नॉर्तजे या चौघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मुकेश कुमार याने 1 विकेट घेत इतर गोलंदाजांना चांगली साथ दिली.
केकेआर प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, लिटॉन दास, जेसन रॉय, सुनील नरेन, रिंकू सिंह, मंदीप सिंह, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव आणि कुलवंत खेजरोलिया.
दिल्ली कॅपिट्ल्स इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, मनीष पांडे, फिल सॉल्ट, ललित यादव, अमन खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, इशांत शर्मा आणि मुकेश कुमार.