Video : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कृतीचं कौतुक, दिव्यांग आमीरच्या गोलंदाजीवर विकेटकीपिंग केली आणि…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातील मोठं नाव..त्याच्या नावाशिवाय क्रिकेटचं परीघ अपूर्णच राहील. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तरी हाती घेतलेला वसा काही सोडला नाही. आता क्रिकेट मैदानात त्याच्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Video : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कृतीचं कौतुक, दिव्यांग आमीरच्या गोलंदाजीवर विकेटकीपिंग केली आणि...
Video : सचिन तेंडुलकरने जिंकली क्रीडा चाहत्यांची मनं, दिव्यांग आमिरच्या गोलंदाजीवर विकेटकीपिंगसह केलं असं काम
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 4:24 PM

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गेली अनेक वर्षे क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहे. अनेक विक्रमांना त्याने गवसणी घातली आहे. काही विक्रम तर भविष्यातही मोडणं अशक्य आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण क्रिकेटवरील त्याचं प्रेम कायम आहे. क्रिकेटच्या मैदानात उतरण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा सचिन तिथे आपसूक उभा असतो. क्रिकेटचं मैदान आणि त्याचं एक वेगळं नातं आहे. तसेच प्रतिभावंत खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात तो कोणतीच कसर सोडत नाही. काश्मीरचा दिव्यांग क्रिकेटपटू आमिर हुसैन यालाही प्रोत्साहन दिलं. काश्मीरमध्ये जाऊन त्याची भेट घेतली. इतकंच काय तर एका खास सामन्यासाठी आमीरला त्याने मुंबईत बोलवलं. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बॉलिवूड आणि क्रिकेटमधील दिग्गज आमनेसामने आले.

सामना सुरु होण्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आमिर हुसैनला मैदानात बोलवलं. इतकंच काय तर आमिरला 10 नंबरची जर्सी तर दिली. त्याचबरोबर त्याची जर्सी परिधान करून मैदानात उतरला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ही कृती पाहून आमिर देखील भावुक झाला.

सामन्यात आमीर गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने पायाने गोलंदाजी केली. क्रीजवर बिग बॉस विनर फारुकी गोलंदाजी करत होता. यावेळी सचिन तेंडुलकरने विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळली आणि त्याचं मनोबळ वाढवलं. तर फलंदाजीसाठी आमिरला आपला ओपनिंग पार्टनरही बनवला. या डावात सचिन तेंडुलकर 17 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. बिग बॉस 17 चा विजेता मुनावर फारुकीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची विकेट घेतली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काश्मीर दौऱ्यात सचिन तेंडुलकरने आमीरची भेट घेतली होती. तसेच त्याला आपली सही असलेली बॅट गिफ्ट दिली होती. आमिरचा आत्मविश्वास पाहून प्रेरणा मिळाल्याचं यावेळी सचिन तेंडुलकरने सांगितलं होतं. दरम्यान, या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होत आहेत. ही लीग 10-10 षटकांची असणार आहे. यामध्ये टेनिस बॉलने सामने खेळवले जातील. माझी मुंबई अमिताभ बच्चन, श्रीनगरचा वीर अक्षय कुमार, बंगळुरू स्ट्रायकर्स हृतिक रोशन, न्नई सिंघम्सचा सूर्या, फाल्कन रायझर्स हैदराबाद राम चरण आहे आणि टायगर्स ऑफ कोलकाताचा मालक सैफ आणि करीना आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.