मुंबई : आयपीएल 2024 च्या सीझनआधी सर्व संघांनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. आयपीएल लिलावाला आता काहीच दिवस बाकी राहिले आहेत. काही फ्रँचायझींनी आपल्या संघातील बड्या खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंची नावं आहेत. मात्र पंजाब संघाने एक मोठा निर्णय घेतला असून तो भविष्यात त्यांना घातक ठरू शकतो. कारण रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये एक खेळाडू लंगडा घोडा असल्यासारखा आहे.
पंजाबच्या टीम मॅनेजमेंटने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये लिलावाच्या इतिहासातील सर्वाधिक किमतीचा खेळाडू आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सॅम करन आहे. पंजाब संघासाठी त्याला रिटेन करण्याचा निर्णय आत्मघातक ठरू शकतो. मागील सीझमध्येही सॅम करन याला पंजाबने मोजलेल्या पैशाप्रमाणे छाप पाडता आली नव्हती.
आता सुरू असलेल्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधील पहिल्या वन डे सामन्यामध्ये इंग्लंड संघाचा पराभव झाला. इंग्लंड संघाने 325-10 धावा केल्या होत्या, या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये १९ धावांची गरज होती आणि इंग्लंडकडून सॅम करन बॉलिंग करत होता. त्यावेळी अल्झारी जोसेफ याने एक धाव काढत शाई होपला स्ट्राईकला दिली. त्यानंतर होपने करन याला तीन सिक्स मारत सामना जिंकवला.
पंजाब संघाने सॅम करनसाठी 18.50 कोटी रूपये मोजले होते. यंदाही पंजाबने त्याला संघात कायम ठेवल्याने क्रिकेट वर्तुळात याची जोरदार चर्चा आहे. कारण करनला रिलीज केलं असतं तर लिलावासाठी पंजाबकडे आणखी पैसे वाढले असते. मात्र इतके पैसे लावून पंजाबने त्याला विकत घेतलं म्हणजे त्याच्यामागे काहीतरी कारण असावं. मात्र यंदाच्या सीझनमध्येही सॅम करन फेल गेला तर पंजाबसाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे लंगड्या घोड्याला संघात ठेवल्याचीही चर्चा क्रिकेट वर्तुळात होताना दिसत आहे.