Hardik Pandya, Yuzvendra Chahal :’हार्दिकमुळे थंडी जास्त, 3 स्वेटरही काम करेना’, जाणून घ्या चहल असं का म्हणाला?

युझवेंद्र चहल हा विजयाचा हिरो ठरला. या सामन्यात त्याने केवळ एक विकेट घेतली. त्याच्या तरबेज गोलंदाजीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. विजयानंतर चहलने अजब विधान केलं.

Hardik Pandya, Yuzvendra Chahal :'हार्दिकमुळे थंडी जास्त, 3 स्वेटरही काम करेना', जाणून घ्या चहल असं का म्हणाला?
Hardik PandYa, Yuzvendra ChahalImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 10:02 AM

नवी दिल्ली : भारतानं (IND) काल दीपक हुडा, इशान आणि हार्दिकच्या तुफान खेळीवर सामना जिंकला. टी-20 (T-20) T20 मालिकेतील दोन सामन्यांच्या पहिल्या सामन्यात भारतानं आयर्लंडचा (IRE) 7 गडी राखून पराभव केला. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कर्णधारपदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण विजयानं झालं. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं 2 टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडचा सहज पराभव केला. पावसानं व्यत्यय आणलेल्या सामन्यात टीम इंडियाने विजयासाठी 9 षटकांत 109 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. लेगस्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा विजयाचा हिरो ठरला. या सामन्यात त्याने केवळ एक विकेट घेतली. त्याच्या तरबेज गोलंदाजीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. विजयानंतर चहलने अजब विधान केलं. त्यांचे विधान आयर्लंडच्या थंडीबाबत होतं. मात्र, आता त्याचाही थेट संबंध हार्दिकशी जोडला गेलाय. यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. त्या थंडीचा हार्दिकशी काय संबंध जाणून घ्या…

हार्दिकची कॅप्टनसी कूल

चहलने हार्दिकच्या कॅप्टन्सीबाबत एक मजेशीर विधान केलंय. तो म्हणाला की, ‘हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाचं वातावरण एकदम मस्त आहे. तो मला आणि इतर खेळाडूंना त्याची आयडीया उघडपणे अंमलात आणण्याचं स्वातंत्र्य देतोय. त्यामुळे संघाचं तापमानही घसरलंय आणि तीन स्वेटर घालूनही मला माझे काम करता येत नाही.’ असं चहलनं म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

हवामान इतकं थंड…

युझवेंद्र चहलनं आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात 3 षटकात 11 धावा देत 1 बळी घेतला. त्याचा इकॉनॉमी रेट 3.66 होता. बाकीच्या भारतीय गोलंदाजांच्या तुलनेत खूपच कमी होता. सामन्यानंतर चहल म्हणाला, ‘आयर्लंडमधील हवामान इतके थंड आहे की येथे गोलंदाजी करणे कठीण होत आहे. मी फिंगर स्पिनर झाल्यासारखे वाटले. पण, मला या परिस्थितींपासून स्वतःला वाचवायचं होतं.’

भारताने 16 चेंडू राखून सामना जिंकला

भारत-आयर्लंडमधील पहिल्या T20 बद्दल बोलायचं झाल्यास पावसामुळे हा सामना 12-12 षटकांचा करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं 4 गडी गमावून 108 धावा केल्या. हॅरी टेक्टरने नाबाद 64 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी भारताकडून हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताकडून दीपक हुडा आणि इशान किशन यांनी डावाची सलामी दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 16 चेंडूत 30 धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करून दिली. याच स्कोअरवर 26 धावा करून किशन बाद झाला. मात्र, हुडाने जोरदार फलंदाजी सुरू ठेवली आणि 47 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.