Aus vs Ind 3rd Test | नगरी भाषेत रहाणे म्हणाला, निकालाची पर्वा नव्हती, शेवटपर्यंत लढायचं ठरवलं होतं!
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला.
सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) यांच्यातील तिसरा सामना अनिर्णित राहिला. निर्णायक क्षणी टीम इंडियाच्या अश्विन आणि हनुमा विहारीने महत्वाची भागीदारी केली. अश्विन आणि विहारीने कांगारुंना अखेरपर्यंत विकेटसाठी रडवलं. मात्र आपली विकेट गमावली नाही. या भागीदारीमुळे हा सामना अनिर्णित राखण्यास टीम इंडियाला यश आले. या कामगिरीमुळे टीम इंडियाचं आणि कर्णधार अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) कौतुक केलं जातंय. आम्हाला निकालाची पर्वा नव्हती, पण आम्ही शेवटपर्यंत लढायचं ठरवलं होतं, अशी प्रतिक्रिया कर्णधार अजिंक्य रहाणेने दिली. (it was decided to fight till the end of match said team india captain ajinkya rahane)
पाहा काय म्हणाला रहाणे
रहाणे भावा मराठी छावा ?pic.twitter.com/he82IPXxWV
— . (@sanket7262) January 11, 2021
तिसऱ्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत अजिंक्यने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. तसेच अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तुझ्या समोर अनेक अडचणी होत्या. अनेक खळाडू दुखापतग्रस्त होते. अशा अडचणीतही टीम इंडिया इतकी चांगली खेळली, तुला याबाबत कर्णधार म्हणून काय वाटतं, असा प्रश्न क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी अजिंक्यला विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना रहाणे म्हणाला की ” आम्ही ज्या पद्धतीने खेळलो, त्याबद्दल मला फार अभिमान आहे. टीम इंडियाने चांगला खेळ केला. अॅडिलेड आणि मेलबर्न या पहिल्या दोन सामन्यात परिस्थिती वेगळी होती. या दोन्ही सामन्यात टीम इंडियाने परिस्थितीनुसार कामगिरी केली. मेलबर्नमध्ये टीम इंडियाने विजय मिळवत जोरदार पुनरागमन केलं. या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात मजबूत स्थितीत होती. मात्र त्यानंतर गोलंदाजांनी कांगारुंना दणका दिला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर गुंडाळला. याच सर्व श्रेय गोलंदाजांचं आहे”, असं म्हणत रहाणेने टीम इंडियाच्या गोलंदाजांचं कौतुक केलं.
“निकालाची पर्वा नव्हती”
“निकालाची चिंता न करता कांगारुंना झुंज द्यावी, इतकत मला वाटत होतं. निकाल कधीच आपल्या हातात नसतो. यात मी विश्वास ठेवतो. आपल्या हातात निकाल कधीच नसतो. पण आपण शेवटपर्यंत प्रयत्न करायला हवे. तुम्ही पूर्ण समर्पणाने खेळायला हवं, हे मी क्रिकेटमधूनच शिकलोय”, असंही रहाणेने नमूद केलं.
रहाणे काय म्हणाला?
“आजचा दिवस हा सर्वांसाठीच अविस्मरणीय असेल. हा दिवस टीम इंडियासाठी फार महत्वाचा होता. हे आपल्याला दोन महिन्यांनंतरही लक्षात राहिल. टीम इंडियाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. या कामगिरीसाठी मी टीम इंडियाचा एक भाग आणि कर्णधार म्हणून मी फार खूश आहे”, अशी भावना रहाणेने व्यक्त केली.
सामना आणि पाचव्या दिवसाबद्दल प्रतिक्रिया
“हा तिसरा कसोटी सामना आणि पाचवा दिवस टीम इंडियासाठी विजयासारखाच होता. जेव्हा आपण देशाबाहेर येतो तेव्हा आपल्यासाठी प्रतिकूल स्थिती असते. मात्र अशातही आपण जेव्हा विरोधी संघाला अशी कडवी झुंज देतो तसेच विजय मिळवतो तेव्हा फार बरं वाटतं”, असं रहाणे म्हणाला. तसेच त्याने टीम इंडियाच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि टीम मॅनेजमेंटचेही आभार मानले.
संबधित बातम्या :
Australia vs India, 3rd Test | “आज पाकिस्तानला हरवल्यासारखं वाटतंय”
Australia vs India, 3rd Test, 5th Day Live : संकटमोचक हनुमा विहारीला अश्विनची साथ, तिसरी कसोटी ड्रॉ
(it was decided to fight till the end of match said team india captain ajinkya rahane)