IPL 2022: नाश्त्यावेळी प्लॅन ठरला! जिमी निशमनं ट्रेन्ट बोल्टला KLच्या विकेटसाठी नेमकं काय करायला सांगितलं?

भारताचा आघाडीचा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2022) लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. राहुल हा नवीन संघाची रन मशीन आहे. लखनौविरोधात जिंकायचं असेल तर राहुलला लवकर बाद करणं गरजेचं आहे हे प्रत्येक संघाला चांगलंच माहिती आहे.

IPL 2022: नाश्त्यावेळी प्लॅन ठरला! जिमी निशमनं ट्रेन्ट बोल्टला KLच्या विकेटसाठी नेमकं काय करायला सांगितलं?
Trent Boult Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 1:54 PM

मुंबई : भारताचा आघाडीचा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2022) लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. राहुल हा नवीन संघाची रन मशीन आहे. लखनौविरोधात जिंकायचं असेल तर राहुलला लवकर बाद करणं गरजेचं आहे हे प्रत्येक संघाला चांगलंच माहिती आहे. रविवारी राजस्थान विरुद्ध लखनौ सामन्यात राजस्थानचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टने राहुलला सामन्यातील पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचित करुन राजस्थानच्या विजयाचा पाया रचला. मोहीम मोठी आणि अवघड असेल तर त्याआधी तयारी आणि प्लॅनिंग जोरदार असलं पाहिजे. त्यासाठीची भक्कम योजना तयार असली पाहिजे आणि ती मैदानावरदेखील नीट राबवता आली पाहिजे. राहुलला बाद करण्याची योजना राजस्थानच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग नसलेल्या खेळाडूने बनवली आणि ट्रेंट बोल्टने ती मैदानात पार पाडली. खुद्द बोल्टने (Trent Boult) सामन्यानंतर आपल्या सहकाऱ्याला या विकेटचं श्रेय दिलं.

राजस्थान रॉयल्सच्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी केएल राहुल मैदानात आला तेव्हा तो लखनौच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर डगआउटमध्ये परतला. हे षटक आणि तो चेंडू ट्रेंट बोल्टचा होता, ज्याने लखनौच्या कर्णधाराला गोल्डन डकवर बाद केलं.

केएल राहुलच्या विकेटमागे कोणाचं डोकं होतं?

या डावखुऱ्या किवी फास्ट बोलरने अशी काय खास गोष्ट केली की त्यामुळे राहुल पहिल्याच चेंडूवर बाद झाला? याबाबत विचारणा केल्यावर त्यावर बोल्टने सांगितले की राहुलला बाद करण्याची रणनिती माझा सहकारी जिमी नीशम याच्या मेंदूची उपज होती. साधारणपणे ओव्हर द विकेट गोलंदाजी करणाऱ्या बोल्टने या सामन्यात केएल राहुलसाठी राउंड द विकेट गोलंदाजी केली आणि त्यात त्याला यश मिळाले.

सामन्यानंतर ट्रेंट बोल्ट म्हणाला, “केएल राहुलला बाद करण्याची योजना सकाळी नाश्त्याच्या टेबलावर बनवण्यात आली होती. सकाळच्या नाश्त्यादरम्यान, जिमी आणि मी केएल राहुलबद्दल चर्चा करत होतो. मग त्यानेच केएलविरुद्ध मी राउंड द विकेट गोलंदाजी करावी अशी कल्पना सूचवली आणि राहुल त्यात अडकला.”

राहुलने बोल्टला दिलं श्रेय दिले

ट्रेंट बोल्टचा तो पहिला चेंडू इतका जबरदस्त होता की, केएल राहुल त्यावर पूर्णपणे बीट झाला. त्या चेंडूने प्रभावित होऊन केएल राहुल सामन्यानंतर म्हणाला की, ”मी तो चेंडू पाहिलाच नाही. याचे सर्व श्रेय बोल्टला जाते. माझ्या मते तो एक शानदार बॉल होता.”

या सामन्यात केएल राहुलचे खातेही उघडले नाही. पण ट्रेंट बोल्टने 4 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. केएल राहुलचे अपयश लखनौ सुपर जायंट्सच्या पराभवाचे कारण ठरले आणि राजस्थान रॉयल्सने हा सामना 3 धावांनी जिंकला.

इतर बातम्या

IPL 2022 Orange Cap : ऑरेंज कॅपवर जॉस बटलरची पकड कायम, पर्पल कॅपचा मानकरी युझवेंद्र चहल

IPL 2022 Purple Cap : युझवेंद्र चहल पर्पल कॅपचा मानकरी; लखनऊच्या चार महत्त्वाच्या विकेट घेतल्या

IPL 2022 SRH vs GT Live Streaming: जाणून घ्या हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.