Jason Roy IPL: जेसन रॉयचा आयपीएलला रामराम, पण PSL मध्ये सहभागी, सोशल मीडियावर ‘भारत-पाकिस्तान’

| Updated on: Mar 01, 2022 | 7:53 PM

IPL 2022 स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयने (Jason Roy) आयपीएल 2022 स्पर्धेतून (IPL 2022) माघार घेतली आहे. आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना मोठा काळ बायो बबलमध्ये काढावा लागणार आहे. त्यामुळेच जेसन रॉयने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Jason Roy IPL: जेसन रॉयचा आयपीएलला रामराम, पण PSL मध्ये सहभागी, सोशल मीडियावर भारत-पाकिस्तान
Jason Roy
Follow us on

नवी दिल्ली: IPL 2022 स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयने (Jason Roy) आयपीएल 2022 स्पर्धेतून (IPL 2022) माघार घेतली आहे. आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना मोठा काळ बायो बबलमध्ये काढावा लागणार आहे. त्यामुळेच जेसन रॉयने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या आठवड्यातच रॉयने याची माहिती अहमदाबाद फ्रेंचायजीला दिली होती. जेसन रॉयची जागा आता कोण घेणार? ते अद्याप गुजरात टायटन्सने जाहीर केलेलं नाही. आयपीएल 2022 ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सने दोन कोटी रुपयांच्या बेस प्राइसमध्ये रॉयला विकत घेतलं होतं. आयपीएलमधून माघार घेण्याची जेसन रॉयची ही दुसरी वेळ आहे. याआधी दिल्ली कॅपिटल्सने त्याला दीडकोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. पण व्यक्तीगत कारणं सांगून त्याने माघार घेतली होती.

जेसन रॉयची माघार हा गुजरात टायटन्ससाठी नक्कीच मोठा धक्का आहे. त्यांच्याकडे सलामीसाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीयत. शुभमन गिलसोबत आता त्यांना नवीन ओपनर शोधावा लागणार आहे. गुजरात टायटन्स हा जेसन रॉयसाठी आयपीएलमधला चौथा संघ होता. याआधी तो 2017 मध्ये गुजरात लॉयन्स, 2018 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि 2021 मध्ये सनरायजर्स हैदराबादसाठी खेळला आहे.

आयपीएल 2021 मध्ये जेसन रॉयला कोणीही विकत घेतलं नाही. मिचेल मार्श दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्याजागी जेसन रॉयचा समावेश करण्यात आला. जेसन रॉयने आयपीएलमध्ये 13 सामन्यात 29.90 च्या सरासरीने 329 धावा केल्या आहेत. 129.01 चा स्ट्राइक रेट होता. जेसन रॉयच्या नावावर दोन अर्धशतक आहेत. दिल्ली आणि हैदराबादसाठी त्याने ही कामगिरी केलीय.

पीएसएलमध्ये सहभागी आयपीएलला नकार

31 वर्षाच्या या इंग्लिश क्रिकेटपटूने नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान सुपर लीग 2022 मध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं. रॉय या स्पर्धेत क्वेट्टा ग्लॅडिएटर्स संघाकडून सहा सामने खेळला होता. पीएसएलमध्ये जेसन रॉयने 50.50 च्या सरासरीने 303 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 170.22 होता. यंदा आयपीएलमध्ये 10 संघ आहेत. मुंबई आणि पुण्यात सर्व सामने होणार आहेत. लीग स्टेजमध्ये एकूण 70 सामने होतील. दोन महिने ही स्पर्धा चालणार आहे. आयपीएल स्पर्धा 26 मार्चपासून सुरु होईल. 29 मे रोजी अंतिम सामना खेळला जाईल.

सोशल मीडियावर चाहते भिडले

पीएसएल खेळून आयपीएलमध्ये न खेळणाऱ्या जेसन रॉयवर भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर हल्ला चढवला आहे. तर पीएसएलचे चाहते रॉयच्या समर्थनात मैदानात उतरतले आहेत. रॉयच्या ट्विटवरील कमेंट बॉक्समध्ये दोन्ही बाजूचे चाहते भिडले आहेत.

इतर बातम्या

Rohit Sharma: ‘रोहित शर्मा आज संघात आहे कारण…’ एका मोठ्या क्रिकेटपटूने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

Salil Ankola: 28 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती, मग बॉलिवूड गाजवलं, आता मुंबई क्रिकेटमध्ये मोठी जबाबदारी

Russia Ukraine War: रशियन फौजांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलं केविन पीटरसनचं कुटुंब