शानदार जबरदस्त ! जसप्रीत बुमराहची अर्धशतकी खेळी, सहकाऱ्यांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए संघात सिडनी येथे दुसरा सराव सामना खेळण्यात येत आहे.

शानदार जबरदस्त ! जसप्रीत बुमराहची अर्धशतकी खेळी, सहकाऱ्यांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 4:24 PM

सिडनी : ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध टीम इंडिया यांच्यात दुसरा सराव सामना (Australia A vs India 2nd Practice match) खेळण्यात येत आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड (SCG) येथे खेळण्यात येत आहे. टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा आपल्या अचूक आणि भेदक यॉर्करसाठी प्रसिद्ध आहे. पण बुमराहने या सामन्यात अशी कामगिरी केली की त्याला सहकाऱ्यांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ (Guard of Honor) देण्यात आला. विशेष म्हणजे या दुसऱ्या सराव सामन्यात बुमराहने बॅटिंगने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे त्याला सहकाऱ्यांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. Jaspreet Bumrah’s half-century in the second practice match against Australia A, ‘Guard of Honor’ by teammates

नक्की काय झालं?

या सराव सामन्याला 11 डिसेंबरपासून सुरुवात झाली. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात सुरुवातीच्या काही फलंदाजांचा अपवाद वगळता कोणत्याही खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या ए संघाने टीम इंडियाला झटके दिले. त्यामुळे टीम इंडियाचा डाव गडगडला. मात्र बुमराह टीम इंडियाचा तारणहार ठरला.

बुमराहने टीम इंडियासाठी चक्क अर्धशतकी खेळी केली. विशेष म्हणजे पहिल्या डावात टीम इंडियाकडून सर्वाधिक बुमराहने केल्या. बुमराहने नाबाद 57 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 55 धावा केल्या. बुमराहच्या या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाला पहिल्या डावात सर्वबाद 194 इतकी मजल मारता आली. टीम इंडियाचा डाव आटोपल्यानंतर बुमराह ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला. यावेळेस ड्रेसिंग रुमच्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी बुमराहला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला.

ऑस्ट्रेलिया ‘ए’ चा पहिला डाव

टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया ए संघाला पहिल्या डावात 194 धावांचे आव्हान दिले. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंचा पहिला डाव 108 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स मिळवल्या. तसेच मोहम्मद सिराजने 1 खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला.

टीम इंडियाचा दुसरा डाव

टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया ए चा डाव 108 धावांवर गुंडाळल्याने 86 धावांची आघाडी मिळाली. दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार टीम इंडियाचा 306-4 अशी धावसंख्या आहे. टीम इंडियाकडे 392 धावांची आघाडी आहे. टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. दरम्यान या सराव सामन्यानंतर 17 सप्टेंबरपासून पहिला कसोटी सामना अॅडिलेड येथे खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

IND Vs AUS | ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार

Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, पहिल्या टेस्टमधून डेव्हिड वॉर्नर बाहेर

Jaspreet Bumrah’s half-century in the second practice match against Australia A, ‘Guard of Honor’ by teammates

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.