IND vs IRE : जसप्रीत बुमराह याच्या गोलंदाजीत उतरला ‘लगान’चा गोली! चेंडू टाकताना करतो तसंच काहीसं Watch Video
जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर पोहोचली आहे. दीड वर्षांच्या कालावधीनंतर जसप्रीत बुमराह टीम इंडियाकडून खेळणार आहे. यावेळी त्याच्या गोलंदाजीत बदल दिसत असल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबई : आयर्लंड विरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया पोहोचली आहे. जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात टीम इंडिया खेळणार आहे. जसप्रीत बुमराह गेल्या एक वर्षापासून पाठदुखीमुळे टीम इंडियात खेळत नव्हता. सर्जरीनंतर दुखापतीतून सावरत जसप्रीत बुमराह याने टीम इंडियात पुनरागमन केलं आहे. इतकंच काय तर त्याच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. बुमराह भारतीय गोलंदाजीच्या भात्यातील प्रमुख अस्र आहे. आता दुखापतीनंतर त्याची कामगिरी कशी राहते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेपूर्वी टीम इंडिया नेटमध्ये सराव करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. यात बुमराह आपल्या गोलंदाजीला धार करताना दिसत आहे. पण त्याची अॅक्शन आणि बॉल टाकताना होणारा आवाज नेटकऱ्यांना वेगळीच आठवण करून देणार आहे. यावेळी नेटकऱ्यांना लगान चित्रपटातील गोलीची आठवण झाली.
जसप्रीत बुमराह चेंडू टाकताना काय करतो?
लगान चित्रपटात गोली हे पात्र बॉल टाकताना एक विशिष्ट आवाज करायचा. तसाच काहीसा प्रकार जसप्रीत बुमराहच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. लगान चित्रपटातील गोली हे पात्र गोलंदाजी करताना सुरुवातीला इंग्लंडच्या खेळाडूंना जेरीस आणतं. पण शेवटी नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या कर्णधाराच्या लक्षात येतं आणि बॉल टाकताना एक विशिष्ट आवाज करतो. मग तो स्ट्राईकला असलेल्या फलंदाजाला सांगतो आणि त्यानंतर त्याचा सामना करणं सोपं होतं.
The moment we have all been waiting for. @Jaspritbumrah93 like we have always known him. 🔥🔥 #TeamIndia pic.twitter.com/uyIzm2lcI9
— BCCI (@BCCI) August 16, 2023
काही दिवसांपूर्वी बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत जसप्रीत बुमराह याच्या गोलंदाजीचा व्हिडीओ समोर आला होता. पण त्या व्हिडीओतून तितकी स्पष्टता नव्हती. मात्र आता बीसीसीआयने टाकलेल्या व्हिडीओत बुमराह गोलंदाजी करताना एक विशिष्ट आवाज करत असल्याचं नेटकरी सांगत आहेत. या आवाजामुळे लगान चित्रपटाची आठवण नेटकऱ्यांना आली. गोली देखील गोलंदाजी करताना असाच आवाज करतो.
दोन्ही संघाचे खेळाडू
टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर, शिवम दुबे, शाहबाज अहमद, संजू सॅमसन, जितेश शर्मा, रवि बिश्णोई, प्रसिद कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, अवेश खान
आयर्लंड : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, रॉस अडायर, हॅरी टॅक्टर, गॅरेथ डेलानी, कर्टिस कँपर, जॉर्ज डॉकरेल, फिओन हैंड, लोर्कन टकर (विकेटकीपर), मार्क अडायर, जोशुआ लिटिल, बॅरी मॅक्कार्थी, थियो वॅन वोर्कोम, बेंजामिन व्हाइट, क्रेग यंग