जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा, नोंदवला आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम

ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर मालिका गमवण्याची नामुष्की ओढावली आहे. पण असं असताना जसप्रीत बुमराह एकहाती खिंड लढवत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आपल्या कामगिरीने नवं शिखर गाठलं आहे. आतापर्यंत अशी कामगिरी करणं कोणत्याही भारतीय गोलंदाजाला शक्य झालं नाही.

जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा, नोंदवला आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 2:31 PM

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. कांगारूंना सर्वाधिक भिती कोणाची वाटत असेल तर ती जसप्रीत बुमराहची.. कारण या मालिकेत त्याने सर्वाधिक विकेट घेत ऑस्ट्रेलियाला दणका दिला आहे. असं असताना या वर्षाच्या सुरुवातीला जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान आहे. या वर्षाच्या सुरुवातीला देखील त्याचं हे स्थान अबाधित आहे. पण त्याने पहिलं स्थान काबिज करताना एका विक्रमाची नोंद केली आहे. यापूर्वी अशी कामगिरी करणं कोणत्याही भारतीय गोलंदाजाला शक्य झालं नाही. मेलबर्न कसोटीत 9 विकेट घेत त्याने या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयसीसीने नुकतंच कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात जसप्रीत बुमराह 907 गुणांसह अव्वल स्थानी आहे. आयसीसी क्रमवारीत सर्वाच्च रँकिंगसह भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताच्या कोणत्याही गोलंदाजाने हा आकडा गाठला नाही.

आर अश्विनने 2016 मध्ये 904 गुणांना स्पर्श करत पहिलं स्थान काबिज केलं होतं. मागच्या आठवड्यात जसप्रीत बुमराह या गुणांसह आर अश्विनच्या पंगतीत बसला होता. मात्र मेलबर्न कसोटीत 9 विकेट घेत त्याच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे. तसेच 907 गुणांसह अव्वल स्थान गाठणारा पहिला फलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराहसाठी 2024 वर्ष संस्मरणीय राहिलं आहे. त्याने 21 आंतरराष्ट्रीय सामन्यात 13.76 च्या सरासरीने 86 विकेट घेतल्या आहेत. यात 5 वेळा 5 विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. तर 13 कसोटी सामन्यात 71 विकेट घेतल्या आहेत. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेच्या 4 सामन्यात 30 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या आसपास दुसरा गोलंदाज नाही.

दरम्यान, आयसीसी जारी केलेल्या क्रमवारीत बुमराहाच्या आसपास देखील कोणी नाही. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड 843 गुणांसह दुसऱ्या, तर पॅट कमिन्स 837 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेचा कगिसो रबाडा 832 चौथ्या, तर मार्को यानसेन 803 गुणांसर पाचव्या स्थानी आहे. दुसरीकडे, इंग्लंडचा सिडनी बार्न्स हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू ठरला आहे. 1914 मध्ये त्यांनी 932 रेटिंग गुण मिळवले होते.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.