चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यास उशीर का? क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढवणारी बातमी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी अजूनही संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. आठ पैकी सहा संघांनी आपले खेळाडू जाहीर केले आहेत. दुसरीकडे, भारतीय संघ निवडीबाबत खलबतं सुरु आहेत. असं असताना भारतीय क्रिकेटप्रेमींचं टेन्शन वाढवणारी एक बातमी समोर आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाकडून फार अपेक्षा आहेत. या स्पर्धेकडे मिनी वर्ल्डकप म्हणून पाहिलं जातं. भारताने वनडे वर्ल्डकप गमावल्यानंतर त्याची कसर या स्पर्धेतून भरून काढावी असं क्रीडाप्रेमींचं मत आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या 8 संघाना यात संधी मिळाली आहे. पण न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिकेसारख्या दिग्गज संघांनी संघ जाहीर केला. मात्र टीम इंडियाचा चमू जाहीर करण्यात अजूनही उशीर होत आहे. बीसीसीआयने आयसीसीकडे हातापाया पडून काही वेळ मागितल्याची चर्चाआहे. पण इतका उशीर करण्याचं कारण काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमी करत आहेत. याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला आहे. सिडनीच्या दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करू शकला नाही. पाठिच्या दुखापतीमुळे त्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी केली नाही. आता बुमराहला एनसीएच्या रिहॅब प्रक्रियेतून जाव लागणार आहे. त्यामुळे रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे. जसप्रीत बुमराह हा भारतीय गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र आहे. जर बुमराह स्पर्धेला मुकला तर टीम इंडियाचं खूपच कठीण होईल.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बुमराह मार्चच्या पहिल्या आठवड्यात बरा होईल असं सांगण्यात येत आहे. याचाच अर्थ असा की बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतील सुरुवातीचे सामने मिस करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफीत बुमराह खेळणार की नाही याबाबत शंका आहे. बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वाधिक गोलंदाजी करत सर्वाधिक विकेट घेण्याचा मान मिळवला होता. पण सिडनी कसोटीत त्याला दुखापत जाणवू लागली आणि मधेच स्कॅनिंगसाठी जावं लागलं.
🚨 NO BUMRAH FOR INDIA IN CT. 🚨
– Jasprit Bumrah likely to miss the group stages of the 2025 Champions Trophy due to back swelling. (Express Sports). pic.twitter.com/anVmanCp4a
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 12, 2025
दुसरीकडे, मोहम्मद शमीची निवड इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी केली आहे. त्यामुळे एकीकडे आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे टेन्शन वाढलं आहे. फिरकीपटू कुलदीप यादवही दुखापतग्रहत होता आणि एनसीएत रिहॅब प्रक्रियेतून जात आहे. पण त्यालाही एनसीएकडून फिटनेस क्लियरन्स मिळालेलं नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याची निवड केलेली नाही. कुलदीप यादवने मागच्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. यात त्याच्या कंबरेला दुखापत झाली आणि टीम इंडियाबाहेर गेला.