ना सचिन, ना रोहित, ना विराट; अर्जुन तेंडुलकरचा आवडता क्रिकेटर कोण? चकित करणारं उत्तर!
अर्जुनला त्याचा आवडता क्रिकेटर कोण, असा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने सर्वांना चकित करणारं उत्तर दिलं. खुद्द 'बाप'माणसाचं नाव त्याने घेतलं नाही. त्याने जसप्रीत बुमराहचं नाव घेतलं. (Jasprit Bumrah is my favourite Cricketers Said Arjun Sachin Tendulkar)
मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) जागतिक क्रिकेटमध्ये इतके विक्रम केले आहेत की ते मोडायलाही पुढची कित्येक वर्ष लागतील. अजूनही तो विविध क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून खोऱ्याने धावा काढतोच आहे. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) देखील क्रिकेट विश्वात पाय ठेऊन बरेच दिवस झालेत. जेव्हा अर्जुनला त्याचा आवडता क्रिकेटर कोण, असा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने सर्वांना चकित करणारं उत्तर दिलं. खुद्द ‘बाप’माणसाचं नाव त्याने घेतलं नाही. ना रोहित शर्माचं नाव घेतलं ना विराट कोहलीचं! जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा माझा आवडता खेळाडू आहे, असं उत्तर त्याने दिलं. (Jasprit Bumrah is my favourite Cricketers Said Arjun Sachin Tendulkar)
जसप्रीत बुमराह आवडता खेळाडू का?
एका लाईव्ह सेशनदरम्यान तुझा आवडता खेळाडू कोण? असा प्रश्न अर्जुन तेंडुलकरला विचारण्यात आला होता. यावेळी जसप्रीत बुमराह हा माझा आवडता खेळाडू आहे, असं उत्तर अर्जुनने दिलं. हे उत्तर सगळ्यांना चकित करणारं होतं कारण त्याने सचिन-रोहित- विराट या कुणाचंच नाव न घेता त्याने बुमराहचा नाव घेतलं.
पाठीमागच्या काही वर्षांपासून जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सकडून चांगली कामगिरी करतोय. मुंबईची वेगवान गोलंदाजीची कमान तो सांभाळतोय. त्याच्या बोलिंग नेतृत्वात मुंबईचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करतोय. बुमराहच्या यॉर्कर बोलिंगने तो अनेक दिग्गज बॅट्समनना सळो की पळो करुन सोडतो. शिवाय डेथ ओव्हर्समध्ये तो फलंदाजांना जखडून ठेवतो.
अर्जुनने गोलंदाज म्हणून त्याच्या कारकीर्दीला सुरुवात केलीय. सध्या तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. प्लेईंग 11 मध्ये दरी त्याला संधी मिळाली नसली तरी तो तो मुंबईच्या संघाबरोबर असतो. नेट्समध्ये कसून सराव करतो. अर्जुन बुमराहला जवळून अनुभवतो आहे. त्याची बोलिंग पाहतो आहे. याच कारणांमुळे अर्जुनने बुमराह हा माझा आवडता खेळाडू असल्याचं सांगितलेलं असावं.
अर्जुनने 20 लाख रुपयांना मुंबईने खरेदी केलंय
यंदाच्या साली लिलावामध्ये अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने रुपये 20 लाखांना खरेदी केलंय. वास्तविक अर्जुन आयपीएलच्या 14 व्या पर्वात एकही मॅच खेळला नाही. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
(Jasprit Bumrah is my favourite Cricketers Said Arjun Sachin Tendulkar)
हे ही वाचा :
वेदानंतर आणखी एका महिला क्रिकेटरवर दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे आईचं निधन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत ए बी डिव्हिलियर्सचा मोठा निर्णय