जसप्रीत बुमराहच्या त्या पोस्टचा आता कुठे अर्थ लागला! सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा
आयपीएल 2024 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर सारून धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर दिली आहे. त्यामुळे आता जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. जसप्रीत बुमराहच्या त्या पोस्टचा अर्थ आता तसाच लावला जात आहे.
मुंबई : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा दबदबा राहिला आहे. पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने ही कामगिरी केली होती. मात्र आयपीएलमधील यशस्वी कर्णधाराला पायउतार होण्याची वेळ आली. मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाची माळ आता हार्दिक पांड्याच्या गळ्यात घातली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने काही दिवसांपूर्वी केलेल्या पोस्टचा अर्थ आता या बातमीशी जोडला जात आहे. गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने आपल्याकडे घेतलं तेव्हाच सर्वकाही सुरु होतं असं चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगली आहे. आता याला जसप्रीत बुमराह याच्या त्या पोस्टची संदर्भ जोडला जात आहे. हार्दिक पांड्याला संघात घेतल्यानंतर दोन दिवसातच जसप्रीत बुमराहने ही पोस्ट केली होती.
जसप्रीत बुमराहने गप्प राहणं कधी कधी खूप चांगलं उत्तर असतं असं लिहिलं होतं. यामुळे जसप्रीत बुमराहला नेमकं काय सांगायचं होतं याचा अर्थ आता चाहते लावत आहे. खऱ्या अर्थाने रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराह हा त्याचा वारसदार ठरू शकला असता, असंही काही चाहते सांगत आहेत. आपल्या भेदक गोलंदाजीने त्याने आपण खरे वारसदार असल्याचं वारंवार सिद्ध केलं आहे. पण कर्णधारपदाची माळ हार्दिक पांड्याच्या गळ्यात पडल्याने खळबळ उडाली आहे.
Bumrah knew💔#RohitSharma𓃵 pic.twitter.com/bsptZOpZL7
— SAM×Angry (@Vitamin_is_back) December 15, 2023
Now that bumrah Instagram story few days before makes sense 😂🔥
Chumbai Indians internal war & downfall started 🥳 pic.twitter.com/CyIIEOnBV8
— MaayoN ᶜˢᵏ 💫🕴️😎 (@itz_satheesh3) December 15, 2023
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टीम इंडियाचा अंतिम सामन्यात पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून टीम इंडियाचा पराभव केला. पण जसप्रीत बुमराहची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. जसप्रीत बुमराह याने 20 गडी बाद केले. एकूण 11 सामन्यात त्याने 20 खेळाडूंना तंबूत पाठवलं होतं. आयपीएलच्या मागच्या पर्वात जसप्रीत बुमराह खेळला नव्हता. दुखापतीमुळे त्याने न खेळण्याच निर्णय घेतला होता. त्यानंतर आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. ही मालिका टीम इंडिया जिंकली होती.
2013 पासून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडे होतं. त्याच्या कारकिर्दित मुंबई इंडियन्सने पाच जेतेपदावर नाव कोरलं आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी हे दोन कर्णधार यशस्वी कर्णधार म्हणून गणले जातात. एकिकडे, महेंद्रसिंह धोनीकडे अजूनही चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद आहे. तर रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं आहे.