‘भाभी मोटी लग रही हो’; म्हणणाऱ्याला जसप्रीत बुमराहची बायको भिडली, पाहा काय घडलं?
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह चर्चेत आला आहे. बुमराह आणि त्याची पत्नीवर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटची सर्वत्र चर्चा आहे. बुमराहच्या पत्नीने त्या ट्रोलरला कमेंट करत उत्तर दिलं आहे.
मुंबई : टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराहने दुखापतीनंतर दमदार कमबॅक केलं आहे. बुमराहने आता सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये चमकदार कामगिरी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. या सामन्यानंतर त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. अशातच बुमराह तिसऱ्या कसोटी सामन्याआधी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे जसप्रीत बुमराह याच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने वादग्रस्त कमेंट केली त्यानंतर त्याच्या पत्नीने उत्तर दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
जसप्रीत बुमराह याने एक पोस्ट केली होती, या पोस्टमध्ये एका नेटकऱ्याने जसप्रीत बुमराह याची पत्नी संजना गणेसनबाबत कमेंट केली. राजा रॉय असं नेटकऱ्याचं नाव असून त्याने ‘भाभी मोटी लग रही हो’, अशी कमेंट केली. या कमेंटमुळे संजना गणेसन चांगलीच भडकली, यानंतर तिने त्याच ठिकाणी कमेंट करत त्याला उत्तर दिलं.
काय म्हणाली बुमराहची पत्नी?
शाळेतील विज्ञानाचं पुस्तक लक्षात नसेल राहत तुझ्या, महिलांच्या बॉडीबद्दल कमेंट करत आहेस, निघ इथून म्हणत संजना गणेसन हिने त्या ट्रोल करणाऱ्याला आपली भडास काढली. सोशल मीडियावर संजनाने केलेली कमेंट जोरदार व्हायरल होत असलेली पाहायला मिळत आहे. कारण आता यानंतर कोणताही ट्रोलर बुमराह आणि संजनाच्या फोटोवर काही चुकीची कमेंट करताना विचार करेल.
दरम्यान, जसप्रीत बुमराहचं कमबॅक सर्व जगाने पाहिलं आहे. आता सुरू असलेल्या कसोटी मालिकेत बुमराह उत्कृष्ट कामगिरी करत आहे. बुमराहचं आफ्रिका संघाचा स्टार गोलंदाज डेल स्टेन याने त्याचं कौतुक केलं होतं. मला वाटत नाही की सध्या असा एकही कसोटी गोलंदाज आहे जो अशा प्रकारचा यॉर्कर टाकेल, असं स्टेन याने म्हटलं आहे.