Jasprit Bumrah : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, यॉर्कर किंग ‘आला रे’, पाहा Video

jaspreet Bumrah Comeback video : भारतीय चाहते त्याला पुन्हा मैदानात खेळताना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. आशिया कप, टी-20 वर्ल्ड आणि आयपीएल या मोठ्या स्पर्धांना बुमराहला मुकावं लागलं होतं. अशातच बुमराहचं कमबॅक आता कन्फर्म झालं आहे.

Jasprit Bumrah : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, यॉर्कर किंग 'आला रे', पाहा Video
जसप्रीत बुमराह आयर्लंडविरूद्धच्या मालिकेविरूद्ध संघात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत रोहित शर्मा याने तो खेळणार की नाही याबाबत माहिती दिली आहे.
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 12:18 AM

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराह क्रिकेटपासून दूर आहे. भारतीय चाहते त्याला पुन्हा मैदानात खेळताना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. आशिया कप, टी-20 वर्ल्ड आणि आयपीएल या मोठ्या स्पर्धांना बुमराहला मुकावं लागलं. याचा सर्वात जास्त फटका टीम इंडियाला बसला आहे. चातक पक्षासारखे त्याचे चाहते बुम बुमची वाट पाहत आहेत मात्र त्याच्या खेळण्याबाबत कोणातीही अपडेट समोर आलीन नव्हती. अशातच बुमराहने स्वत: एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.

नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये?

जसप्रीत बुमराहने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहेत. या व्हिडीओमध्ये, बुमराह गोलंदाजी करताना दिसत असून त्याने बीसीसीआयला टॅग केलं आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला इंग्रजी गाणं वाजत असून त्याचा मराठीमध्ये, सर्वांना सांगी मी घरी येत आहे, असा त्याचा अर्थ होतो. बुमराहने हा व्हिडीओ शेअर केल्यावर चाहते खुश झाले आहेत. त्यांनी बुमराहला जितकं लवकरात लवकर कमबॅक करता  येईल तेवढं कर असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

काहींनी त्याला आणखी आराम कर पण यंदाच्या वर्ल्डकपमध्ये तु संघामध्ये असायलाच हवा, असं म्हटलं आहे. जसप्रीत बुमराहने आपला शेवटचा सामना 2022 साली  खेळला होता. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे तो त्रस्त  झाला होता. शेवटी त्याने सर्जरी केली आणि रेस्ट घेतला होता, मात्र आता भारताचा वाघ परत एकदा माघारी परतण्यासाठी सज्ज झाला असल्याने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

दरम्यान, जसप्रीत बुमराहसोबत टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदात श्रेयस अय्यरही आता सराव करत असल्याचं समोर आलं आहे.  यंदाच्या आशिया कपसाठी जरी बुमराह नाही खेळला मात्र वर्ल्डकपसाठी त्याने तयार असायला हवं.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.