Video : विराट कोहलीला हात मिळवल्यानंतर जय शाह यांचं झालं असं काही, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

न भूतो न भविष्यती असं टी20 चॅम्पियन टीमचं मुंबईत स्वागत झालं. क्रीडारसिकांची आपल्या लाडक्या टीमला पाहण्यासाठी मरीन ड्राईव्हवर गर्दी झाली होती. चाहत्यांनी मन भरून आपल्या चॅम्पियन टीमचं स्वागत केलं. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये विजयी सोहळा रंगला. यावेळी जय शाह आणि विराट कोहली यांचा हस्तांदोलनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेमकं काय झालं? जाणून घ्या

Video : विराट कोहलीला हात मिळवल्यानंतर जय शाह यांचं झालं असं काही, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 3:48 PM

टी20 वर्ल्डकप विजयाचा जल्लोष मुंबईत मोठ्या थाटात पार पडला. वर्किग डे असूनही चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. अंतिम सामना जिंकून पाच दिवस उलटले तरी जोश काही कमी झाला नव्हता. याची अनुभूती विजयी मिरवणुकीत दिसून आली. टी20 वर्ल्डकप विजयानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. या फॉर्मेटच्या शेवटच्या टप्प्यात मिळालेलं यश खरंच खूप महत्त्वाचं ठरलं. विराट कोहली संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेत फेल गेला. मात्र अंतिम फेरीत केलेली कामगिरी सर्वांच्या लक्षात राहणारी आहे. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाला 177 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे विराट कोहलीचे चाहते खूपच खूश आहेत. असं असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओत बीसीसीआय सचिव जय शाह यांनाही विराट कोहलीच्या वर्ल्डकपमधील कामगिरीची भूरळ पडल्याचं दिसत आहे.

बीसीसीआयने चॅम्पियन टीमला 125 कोटी रुपये बक्षिस जाहीर केलं होतं. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे अशी विजयी मिरवणूक निघाल्यानंतर गौरव समारंभ पार पडला. यावेळी सर्व खेळाडूंना धनादेश घेण्यासाठी मंचावर बोलवण्यात आलं. कर्णधार रोहित शर्माच्या पाठोपाठ टीम इंडियाचे एका पाठोपाठ एक स्टेजवर आले. उपकर्णधार हार्दिक पांड्यानंतर वरिष्ठ खेळाडू विराट कोहली स्टेजवर आला. बीसीसीआय आणि एमसीएचे सदस्य खेळाडूंचं हस्तांदोलन करत होते. पण बीसीसीआय सचिव जय शाह यांनी विराट कोहलीला हात मिळवल्यानंतर पुढचं सर्वकाही विसरून गेले. बुमराहशी हात मिळवणी करणंही विसरून गेले. त्यामुळे बुमराहने पहिल्यांदा बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना हात मिळवला .मात्र काही क्षणात जय शाह भानावर आले आणि त्यांनी बुमराहसह इतर खेळाडूंना हस्तांदोलन केलं.

विराट कोहलीची बॅट टी20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात बरोबर चालली आणि त्याचा फायदा टीम इंडियाला झाला. टी20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलपर्यंत विराट कोहलीने एकूण 7 सामन्यात 75 धावांची खेळी केली होती. मात्र ही कसर त्याने अंतिम सामन्यात भरून काढली. विराट कोहलीने 59 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Non Stop LIVE Update
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले.
मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार - वडेट्टीवार संतापले
मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार - वडेट्टीवार संतापले.
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज.
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा.