IND vs AUS Test : ‘तू अश्विनवर जळतोस’, टीम इंडियाच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूला सुनावलं

| Updated on: Feb 05, 2023 | 2:19 PM

IND vs AUS Test : अश्विनसारखीच गोलंदाजीची शैली असलेल्या महेश पिथियाच्या गोलंदाजीवर सराव सुरु आहे. महेश पिथियाला अश्विनचा डुप्लीकेट म्हटलं जातं.

IND vs AUS Test : तू अश्विनवर जळतोस, टीम इंडियाच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूला सुनावलं
R.Ashwin
Follow us on

IND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या चार कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाची टीम भारतात दाखल झाली आहे. बंगळुरुमध्ये त्यांनी सराव सुरु केलाय. 9 फेब्रुवारीला नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना होईल. ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या मनात रविचंद्रन अश्विनच भय स्पष्ट दिसून येतय. त्यांचा अश्विनसारखीच गोलंदाजीची शैली असलेल्या महेश पिथियाच्या गोलंदाजीवर सराव सुरु आहे. महेश पिथियाला अश्विनचा डुप्लीकेट म्हटलं जातं. मायदेशात रविचंद्रन अश्विनचा ऑस्ट्रेलिया विरोधात जबरदस्त रेकॉर्ड आहे.

वसीम जाफर टि्वटमध्ये काय म्हणाले?

भारतात ऑस्ट्रेलिया विरुद्ध आठ कसोटी सामन्यात अश्विनने 50 विकेट घेतल्या आहेत. यात पाच विकेट्सचा समावेश आहे. अश्विनच्या गोलंदाजीचा ऑस्ट्रेलियन्स विशेष सराव करतायत, ही बातमी आल्यानंतर वसीम जाफर आपल्या गमतीशीर शैलीत रिएक्ट झाले. ‘अश्विन ऑसीच्या डोक्यात घुसलाय’, असं त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं. पहिल्या कसोटीला पाच दिवस बाकी आहेत आणि अश्विन आधीच ऑस्ट्रेलियन टीमच्या डोक्यात आहे, असं त्यांनी म्हटलं.

हरभजन चौथ्या स्थानावर

वसीम जाफर यांच्या या टि्वटवर टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंह रिएक्ट झाला. हरभजन सिंगची भारताच्या अव्वल फिरकी गोलंदाजांमध्ये गणना होते. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये हरभजन चौथ्या स्थानावर आहे.


हरभजन काय म्हणाला?

वसीम जाफर यांच्या त्या टि्वटवर हरभजन सिंग रिएक्ट झाले. त्याने एक फोटो पोस्ट केला. त्यावर खेळपट्टीला तडे गेलेले दिसत होते. ‘ही मुख्य गोष्ट ऑस्ट्रेलियन टीमच्या डोक्यात आहे’ असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलेला.


अनेक नेटीझन्सना पटलं नाही

हरभजनच हे टि्वट टि्वटरवर अनेक नेटीझन्सना पटलं नाही. तो अश्विनच्या कामगिरीला कमी लेखण्याचा प्रयत्न करतोय असं नेटीझन्सच मत बनलं. अश्विनच योगदान हरभजनला मान्य नाहीय, असं टि्वटरचा सूर होता. त्यावर फॅन्स आपल्या पद्धतीने रिएक्ट झाले. त्यांनी ट्रोल करताना हरभजनला भरपूर झापलं.

तू अश्विनवर जळतोस

तू तुझ्या काळातील टॉप स्पिनर होता हे मान्य. पण तू अश्विनच योगदान का मान्य करत नाहीयस? असा सवाल एका युजरने केला. तू अश्विनवर जळतोस, असा आरोप काही युजर्सनी केला.