ट्यूशनच्या रस्त्यामध्ये क्रिकेटवर प्रेम, आठवीचं निकालपत्र कायमचं दुश्मन, 23 वर्षीय इंद्राणीचा आता फक्त धमाका सुरु…!

हिंदीमध्ये असं म्हण आहे, इरादों में दम हो तो रुकावटों को रुख मोडना ही पडता हैं...! अशीच काहीशी कहाणी आहे झारखंडची जिगरबाज क्रिकेटपटू बंगाली बाला इंद्राणी रॉय हिची... (Jharkhand Indrani Roy two hundred in domestic league)

ट्यूशनच्या रस्त्यामध्ये क्रिकेटवर प्रेम, आठवीचं निकालपत्र कायमचं दुश्मन, 23 वर्षीय इंद्राणीचा आता फक्त धमाका सुरु...!
इंद्राणी रॉय
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 3:10 PM

मुंबई :  हिंदीमध्ये असं म्हण आहे, इरादों में दम हो तो रुकावटों को रुख मोडना ही पडता हैं…! अशीच काहीशी कहाणी आहे झारखंडची (Jharkhand) जिगरबाज क्रिकेटपटू बंगाली बाला इंद्राणी रॉय (Indrani Roy) हिची…. झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या इंद्राणीचा सध्या धमाका सुरु आहे. तिने आपल्या खेळीने निवड समितीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. इंद्राणीसाठी क्रिकेट खेळणं एवढं सोपं नव्हतं. घरचं वातावरण अनुकुल नसताना तिने क्रिकेटच्या ग्राऊंडकडे आपला मोर्चा वळवला आणि पुढे जाऊन देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली ओळख बनविली. (Jharkhand Indrani Roy two hundred in domestic league)

लहानपणापासूनच इंद्राणीला क्रिकेटमध्ये रस होता, क्रिकेटवर प्रेम होतं. पण, क्रिकेटवर प्रेम होण्यात तिच्या ट्यूशनला जाण्याच्या रस्त्याचा मोठा वाटा राहिला. इंद्राणी त्यावेळेस आठवीत शिकत होती. ट्यूशनला जाताना रस्त्यात तिला क्रिकेटचं मोठं मैदान लागायचं. काही मुली त्या ग्राऊंडवर प्रॅक्टिस कराताना इंद्राणीला दिसायच्या. इंद्राणी हरखून जायची. आपणही असं क्रिकेट खेळावं, सराव करावा असं तिला वाटायचं. हळूहळू तिने क्रिकेटमध्ये रस घ्यायला सुरुवात केली. 15 व्या वर्षी तिचं बॅट आणि बॉलवर प्रेम जडलं

आठवीच्या रिपोर्टकार्डने क्रिकेटच्या स्वप्नांवर पाणी

इंद्राणीने जसा क्रिकेटमध्ये रस घेतला तसंतसं तिचं अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. दिवस-दिवस ती क्रिकेटच्या मैदानावर सराव करायची. कोचकडून क्रिकेटचे बारकावे समजून घ्यायचे. शेवटी तेच झालं, जे होणार होतं. आठवीचा निकाल लागला आणि इंद्राणीला अगदी 50 टक्क्यांहून कमी मार्क मिळाले.

वडिलांनी इंद्राणीचं क्रिकेट बंद केलं

आठवीचा निकाल लागल्यानंतर जेव्हा इंद्राणीला कमी मार्क पडले, तेव्हा तिच्या वडिलांनी तिचं क्रिकेट खेळणं बंद केलं. इथून पुढे क्रिकेट खेळायचं नाही, फक्त अभ्यास करायचा, असा दम तिच्या वडिलांनी तिला भरला. जवळपास दीड वर्ष तिचं क्रिकेट बंद होतं.

यादरम्यान क्रिकेट जरी बंद होतं, पण इंद्राणीने मैदानावरील निरीक्षण सोडलं नव्हतं. या काळात दुसऱ्या मुलींना कोच कसे मार्गदर्शन करतात, कोणते बारकावे सांगतात, याच्यावर इंद्राणी लक्ष ठेवून असायची.

कोचसाहेबांनी वळवलं इंद्राणीच्या वडिलांचं मन

तिला नेहमी मदत करणारे कोच पाचू गोपाल माझी यांनी इंद्राणीच्या वडिलांचं मन वळविण्याचं ठरवलं. एके दिवशी ते इंद्राणीच्या घरी गेले आणि तिच्या वडिलांना समजावलं. वडिलांनीही कोचसाहेबांची गोष्ट मानली. मग मात्र इंद्राणीने मागे वळून पाहिलं नाही.

झारखंडकडून इंद्राणीचा धमाका

23 वर्षीय विकेट कीपर फलंदाज इंद्राणीचा सध्या धमाका सुरु आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने आपल्या खेळाने छाप सोडलीय. झारखंडकडून खेळताना इंद्राणीने मागील 8 सामन्यात 2 दणदणीत शतके ठोकून 456 धावा केल्या आहेत. तिने आपल्या स्फोटक खेळीने मोठ्या टूर्नामेंटची अंतिम फेरीही गाठली आहे.

Jharkhand Indrani Roy two hundred in domestic league

हे ही वाचा :

गौतमपुढे ‘गंभीर’ समस्या, एका ट्विटमुळे दिल्ली पोलिसांच्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?

क्रिकेटपटूंना अतिआत्मविश्वास नडला अन् इथेच कोरोनाने डाव साधला, पाहा IPL मध्ये कोरोनाची एन्ट्री कशी झाली…

कोहली बाबर आझमच्या ‘एक पाऊल पुढे’, पाकिस्तानच्या दिग्गजाची विराटवर स्तुतीसुमने

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.