IND vs ENG | टीम इंडियाला मोठा धक्का, कॅप्टन रोहित शर्माबाबत मोठी अपडेट
Rohit Sharma | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात निर्णायक क्षणी शतक केलं. मात्र त्यानंतर आता रोहितबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
राजकोट | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. इंग्लंडचा पहिला डाव हा चांगल्या सुरुवातीनंतर गडगडला. टीम इंडियाने आर अश्विन याच्या अनुपस्थितीत 126 धावांची भक्कम आघाडी घेतली. इंग्लंडचा डाव 445 धावांच्या प्रत्युत्तरात 319 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने 4 विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली. तर इंग्लंडकडून बेन डकेट याच्या व्यतिरिक्त एकालाही अर्धशतकही करता आलं नाही. डकेटने सर्वाधिक 153 धावा केल्या.
त्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या डावात बॅटिंगसाठी आली. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल मैदानात आले. मोठ्या आघाडीनंतर या दोघांकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र पुन्हा एकदा टीम इंडियाची सलामी जोडी या मालिकेत चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाल मोठा झटका लागला. कॅप्टन रोहित शर्मा याच्या रुपात टीम इंडियाने पहिली विकेट गमावली. रोहित शर्माला जो रुट याने आऊट केलं.
जो रुट टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील 12 वी ओव्हर टाकायला आला. रुटच्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर रोहित शर्माने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहित त्यात अपयशी ठरला आणि बॉल पॅडला जाऊन लागला. इंग्लंडने केलेली अपील अंपायरने अमान्य केली. या निर्णयाला आव्हान देत इंग्लंडने रीव्हीव्यू घेतला. या रीव्हीव्यूमध्ये रोहितच्या बॅटला बॉल न लागल्याने तो एलबीडल्यू आऊट असल्याचं स्पष्ट झालं. अशाप्रकारे टीम इंडियाल पहिला झटका लागला. रोहितने 28 बॉलमध्ये 19 धावा केल्या. रोहित लवकर आऊट झाल्याने टीम इंडियाला एका प्रकारे हा मोठा झटकाच आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.