लंडन : दिग्गज क्रिकेटपटू जो रूटने (Joe Root) इंग्लंडचे कसोटी कर्णधारपद सोडले आहे. अशा स्थितीत आता संघात त्यांची जागा कोण घेणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रेड बॉल क्रिकेटमध्ये इंग्लंडची (England) कमान सांभाळण्यास तयार असलेले अनेक स्पर्धक आहेत. मात्र ईसीबी (ECB) युवा खेळाडूच्या हाती कमान देईल की जो रूटच्या जागी अनुभवी खेळाडूची निवड करेल हे लवकरच कळेल. सध्या याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र येत्या काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. मात्र, जो रूटने कर्णधारपद सोडल्यानंतर आता केवळ केन विल्यमसन हा एकमेव फॅब फोर खेळाडू आहे जो राष्ट्रीय संघाचा कर्णधार राहिला आहे.
जो रूटने कर्णधारपद सोडल्यानंतर इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार होण्याचे अनेक दावेदार आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्ड कसोटी संघाचा नियमित भाग असलेल्या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा सोपवू इच्छित आहे. त्यामुळे बेन स्टोक्स, जॉस बटलर आणि जॉनी बेअरस्टो ही नावे आघाडीवर दिसू शकतात. हे खेळाडू केवळ कसोटी संघाचा भाग नसून ते इंग्लंड संघातही अनुभवी आहेत. अशा स्थितीत ईसीबी त्यांच्या नावांचा विचार करू शकते.
इंग्लंडसाठी 27 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम करणाऱ्या जो रूटने कर्णधारपद सोडल्यानंतर, ECB प्रथम बेन स्टोक्सकडे पाहू शकते. म्हणजेच कसोटी कर्णधार बनण्याच्या शर्यतीत बेन स्टोक्स आघाडीवर असू शकतो. त्याच्याशिवाय आणखी एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे जॉस बटलरचे. मात्र, संघाची कमान कोणाच्या हातात द्यायची, हा निर्णय ईसीबीला घ्यायचा आहे.
फलंदाज म्हणून जो रूटची कामगिरी चांगली झाली आहे. पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाला नुकत्याच झालेल्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी इंग्लंडने अॅशेस मालिकादेखील गमावली आहे. हेच त्याचे पद सोडण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. इंग्लंडने गेल्या 18 पैकी 11 कसोटीत पराभव पत्करला आहे.
जो रुटने 64 कसोटी सामन्यात इंग्लंडचे कर्णधारपद भूषवले आहे. या कालावधीत इंग्लंडने 27 कसोटी सामने जिंकले आहेत, तर 26 सामने गमावले आहेत. दरम्यान, 11 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. कर्णधार म्हणून फलंदाजीत जो रुटची बॅट खूप काही बोलली आहे. त्याने 64 कसोटीत 5295 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 46 राहिली आहे. या 64 सामन्यात त्याने 14 शतके झळकावली आहेत.
इतर बातम्या
Purple Cap 2022 : पर्पल कॅप युजवेंद्र चहलकडे, जाणून घ्या कोणते खेळाडू आहेत टॉप 10 मध्ये
IPL 2022, SRH vs KKR : आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद सनराइजर्स सामना, कोलकाता दुसरं स्थान कायम राखणार?